आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kotak Mahindra Bank Launched New App For Banking Thorugh Facebook

फेसबुकच्या माध्यमातून झटपट रक्कम पाठवणारे अ‍ॅप कोटक महिंद्रा बँकेने आणले बाजारात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गप्पाटप्पा, भावना-विचारांचे आदानप्रदान या टिपिकल गोष्टींपुरताच सोशल मीडिया आता मर्यादित राहिलेला नाही. फेसबुकच्या माध्यमातून झटपट रक्कम पाठवणारे एक अनोखे अ‍ॅप बाजारात आणणारी कोटक महिंद्रा बँक ही जगातील पहिली बँक ठरली आहे. त्यामुळे फेसबुकप्रेमींना 24x7 गप्पाटप्पा करताना तितक्याच वेळा पैसेही पाठवता येणार आहेत. बँकेने ‘के-पे’ या अ‍ॅपद्वारे पेमेंट सेवा उपलब्ध केली आहे. विशेष म्हणजे रकमेची देवाण-घेवाण करणारी व्यक्ती बँकेचे खातेदार असण्याची गरज नाही. एनपीसीआयच्या मदतीने खास तयार केलेल्या ‘आयएमपीएस’ मंचामुळे हे शक्य झाले असल्याचे बँकेचे कार्यकारी उपाध्यक्ष दीपक शर्मा यांनी सांगितले.

व्यवहार मर्यादा
प्रति व्यवहार २,५०० रुपयांची मर्यादा. महिन्याला एकूण २५,००० रुपये पाठवण्याची सुविधा तसेच लाभार्थीलाही प्राप्त करताना तेवढीच मर्यादा.

२८ बँका सहभागी
एनपीसीआयच्या मंचावर सध्या २८ बँका सहभागी असून या बँकांच्या कोणत्याही ग्राहकाला कोटकच्या या नव्या सेवेचा लाभ घेता येईल.

ग्राहकांचा फायदा पैसे पाठवणे सुलभ
* फेसबुकवर आधारित या अ‍ॅपद्वारे कोणत्याही बँकेतून कोणत्याही बँकेत निधी हस्तांतर करणे शक्य
* फेसबुक वापरून केपेवर थेट लॉगिन करता येते
* ग्राहकाच्या बँक तपशिला ची आवश्यकता नाही.
* आयडी आणि पासवर्ड आणि एक वेळचा पासवर्ड. (ओटीपी) अशा दोन स्तरांवर सुरक्षित व्यवहार
* कोणत्याही वेळी नेट बँकिंगच्या गरजेशिवाय पैसे पाठवता येतील.
* एक वेळची प्रक्रिया म्हणून वापरकर्त्यांनी सध्या वापरात असलेल्या बँक खात्याची नोंदणी www.kaypay.com वर करणे गरजेचे आहे.

कसे चालते के-पे अ‍ॅप
बँक खातेदारांना एकमेकांना तत्काळ निधी पाठवण्यासाठी के-पे अ‍ॅपच्या फेसबुक फ्रेंड्स लिस्टमधून रेसिपीअंटची निवड करते. के-पे सोशल साइटमध्ये दोन स्तरांवरील अधिप्रमाणनाचा- युजर आयडी आणि पासवर्ड आणि एक एकवेळचा पासवर्ड (ओटीपी) वापर केला आहे. यात एसएमएस व फेसबुकवर हस्तांतरणाची सूचना मिळते.