आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ladies First In Tata Group: Use Women Skills Syaras Mistri

टाटा समूहात लेडीज फर्स्ट: महिलांच्या कौशल्याचा उपयोग करा- सायरस मिस्त्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - महिलांमध्ये प्रचंड कार्यक्षमता आहे. पण त्यांच्या कौशल्यास कमी लेखल्यामुळे कोणत्याही कंपनीतील कार्यक्षम कर्मचा-यांची संख्या निम्मीच राहते. त्या कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर करण्याचा मनोदय टाटा समूहाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी व्यक्त केला आहे. समूहातील कंपन्यांत महिला कर्मचा-यांना अग्रणी भूमिकेत आणण्याचा संकल्पही त्यांनी सोडला.


टाटा ग्लोबल ब्रेव्हरेजेस लिमिटेडचे अध्यक्ष या नात्याने पहिल्या भाषणात मिस्त्री म्हणाले, कंपनीतील महिलांची भूमिका यापुढेही तेवढीच महत्त्वाची राहील. महिलांनी निर्णायक आणि नेतृत्वाची भूमिका बजावावी, अशी मनोमन इच्छा आहे. आगामी काही वर्षांत समूहातील कंपन्यांत या उपक्रमावर भर देण्यात येईल, असा आपल्याला पूर्ण विश्वास आहे. यासाठी महिलांनीही सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.