आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lamborghini Aventador Roadster Car , Divya Marathi

अँव्हेंटाडोर रोडस्टर जेट फायटरचा थरार!!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2011 मध्ये प्रथम भारतात पदार्पण करण्यापूर्वीच लँबॉर्गिनीची अँव्हेंटाडोर कार सर्वात लोकप्रिय पोस्टर कार बनली होती. त्यापुढील लँबॉर्गिनी अँव्हेंटाडोर रोडस्टर ही कार मूव्हिंग आर्ट फॉर्म असून ती चालवताना 80 वर्षांच्या वृद्धालाही तरुण असल्याचा भास होतो. रस्त्यावरून चालताना ती आणखीच लक्ष वेधून घेते. स्प्लेंडर-स्पोक्स अलॉय व्हिल्स अणि कॉम्प्लेक्स ग्लास इंजिन कव्हरमुळे तिचे सौंदर्य खुलून दिसते.

1 अँव्हेंटाडोर रोडस्टर कारची रचना जेट फायटरसारखी आहे. छत फोल्ड करण्यासाठी या कारमध्ये पुश बटण किंवा फोल्ड-ऑन-द-फ्लाय इलेक्ट्रिक रुफ नाही. इटालियन फॅशनचे अनुकरण करणार्‍या या रचनेत थोडी आणखी मेहनत घ्यावी लागते. सीटबॅक फोल्ड करा, पॅनल रिलिज करण्यासाठी लॅच ओढा आणि बाहेर काढा. ते खालपर्यंत जाऊ द्या. हे सर्व भाग खूप वजनाला हलके आहेत.

ऑडी कंपनीची कार असल्यामुळे त्यात र्जमनीची काही वैशिष्ट्येही आहेत. ऑडीच्या विविध कारमध्ये आढळणारे अनेक भाग यात समाविष्ट आहेत. र्जमन कनेक्शन असल्यामुळे कारच्या एअर कॉनचा प्रतिसाद उत्तम आहे. इंजिन कव्हर मागील बाजूने पाहणे कठीण जाते म्हणून रिव्हर्सिंग कॅमेरा हँडी आहे.

कारमध्ये कुपे कारसारखे 691 बीएचपी, 6.5 लिटर व्ही 12 इंजिन आहे. कुपेपेक्षा ही कार 50 किलोने हलकी असून बरीच चपळ वाटते.

स्पोर्ट्स मोडवर एक्सलरेशन उत्तम आहे. कॉम्प्लेक्स फोर-व्हिल ड्राइव्ह सिस्टिम आणि अँग्रेसिव्ह लाँच कंट्रोलमुळे 1625 किलोची ही कार 3 सेकंदात ताशी ते 100 किलोमीटर वेग धारण करते. कारचा सर्वाधिक वेग ताशी 349 किलोमीटर एवढा आहे.

7 स्पीड, रोबोटाइज्ड मॅन्युअलचा रिस्पॉन्स टाइल, जबरदस्त वेग, जास्त गर्दीच्या ठिकाणी कार हळू चालते, थोडे धक्केही बसतात. कार पार्क करण्यासाठी थोडी अडचण येते.

कारचे कार्बन सिरॅमिक ब्रेक स्टँडर्ड आहे यात रेस कारसारखे पुशरॉड सस्पेंशन असल्यामुळे भारतातील वर्दळीच्या रस्त्यांवर ती चालवणे कठीण आहे. त्यामुळे ती प्रॅक्टिकल कार नाही.

लँबॉर्गिनीच्या नव्या कारने चालकाला अफलातून अनुभव मिळतो, कारची किंमत 6 कोटी रुपये आहे. यासोबत हीरोच्या नव्या स्प्लेंडर आयस्मार्ट बाइकविषयी..
किंमत :5.46 कोटी