आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॅम्ब्रेटाच्या नव्या रूपासाठी प्रतीक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड - स्कूटर्स इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रस्ताव केंद्राने गुरुवारी पुन्हा प्रलंबित ठेवला. एकेकाळी रस्त्यांवर दिमाखात धावणा -या विजय सुपर व लॅम्ब्रेटा स्कूटर पुन्हा त्याच थाटात धावण्याच्या संकेतावर तूर्त पाणी पडले .

या स्कूटर बनवणारी स्कूटर्स इंडिया ही कंपनी अनेक दशके तोट्यात गेल्यामुळे बंद पडली आहे. मात्र, आता केंद्र सरकारतर्फे या स्कूटरला पुन्हा जीवदान देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चंदिगडमध्ये लॅम्ब्रेटा असलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. आजही अनेकांजवळ स्कूटरचे मॉडिफिकेशन केलेले मॉडेल्स आहेत.

प्रस्ताव पुन्हा प्रलंबित : स्कूटर्स इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रस्ताव केंद्राने गुरुवारी पुन्हा प्रलंबित ठेवला. यातील सर्व हिस्सेदारी विकण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर,या उद्योगाला 200 कोटींचे अर्थसहाय्य देण्याचा प्रस्ताव अवजड उद्योग मंत्रालयाने दिला होता.

1972 मध्ये बनली होती कंपनी : स्कूटर्स इंडियाची स्थापना 1972 मध्ये झाली होती. सुरूवातीला कंपनीने विजय सुपर व लॅम्ब्रेटा स्कूटरची निर्मिती केली. 2011-12 मध्ये कंपनीला 20 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.