आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवटचे दोन दिवस : प्राप्तिकर रिटर्न भरण्यापूर्वी वजावटीवर टाका नजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मासिक पगारदार व्यक्तींसाठी प्राप्तिकर रिटर्न भरण्यासाठी केवळ दोन दिवस उरले आहेत. या दोन दिवसांत रिटर्न भरण्यासाठी जात असाल तर वजावटीवर (डिडक्शन) वर बारकाईने नजर मारणे आवश्यक आहे. वजावटीबाबतची पूर्वीपासूनची सवलत आणि यात यंदाच्या वर्षात झालेल्या बदलांमुळे हे अत्यंत गरजेचे आहे. रिफंडचा आकडा वाढवण्यास त्यामुळे मदत होऊ शकते. तसेच जी सवलत मिळते आहे ती मिळवण्यात मदत होईल.

गृहकर्जावरील जादा सवलत :
प्राप्तिकर कायदा (आयटीआर) एक मधील कलम 80 ईई अंतर्गत डिडक्शन क्लेम करण्यासाठी या वेळी जास्त सवलत देण्यात आली आहे. प्रथमच घर खरेदी करणार्‍यांना या अंतर्गत वजावट मिळते. एक एप्रिल 2013 ते 31 मार्च 2014 या काळात गृहकर्ज घेतले असेल तर या कर्जाच्या परतफेडीवरील एक लाख रुपयांपर्यंतच्या व्याज रकमेवर वजावट मिळवता येते. हा दावा करण्यासाठी होम लोनची रक्कम 25 लाखांपेक्षा कमी असावी आणि घराची किंमत 40 लाखांहून कमी असावी.

भत्त्यांचे विवरण : सेक्शन 10 मध्ये भत्त्याच्या (अलाउन्सेस) सवलतींची माहिती द्यावी लागते. आयटीआर 2 मध्ये एचआरए, एलटीए आदी बाबत जास्त सवलत देण्यात आली आहे. मागच्या वर्षीपर्यंत या भत्त्यांची एकत्रित रक्कम सांगावी लागायची.

भांडवली लाभ : भांडवली लाभाबाबत (कॅपिटल गेन्स) पूर्ण माहिती द्यावी लागणार आहे. यंदा आयटीआर 2 मध्ये भांडवली लाभाला अनेक श्रेणींत विभागण्यात आले आहे. ही श्रेणी कॅपिटल गेन्सच्या प्रकृतिच्या आधारावर बनवण्यात आली आहे.
रिफंड्स : रिफंड आता कोणत्याही परिस्थितीत धनादेशाद्वारे (चेक) पाठवण्यात येणार नाहीत. ही रक्कम थेट संबंधितांच्या बँक खात्यात ट्रान्सफर होईल. यासाठी चेकबुकवर बँक खाते, शाखा, मायकर क्रमांक व इतर माहिती अचूक नमूद करा.

80 सी अंतर्गत मिळणारी वजावट
सी, 80 सीसीसी आणि 80 सीसीडी मध्ये अनेक साधनांतून सवलत मिळवता येते. याची मर्यादा 2014 - 15 साठी दीड लाख रुपयांपर्यंत, तर 2013-14 साठी एक लाख रुपयांपर्यंत आहे.


इतर वजावट
> सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ)
> कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (पीएफ)
> अधिसूचित बँकेतील पाच वर्षांची एफडी
> दोन अपत्यांची ट्युशन फी
> ज्येष्ठ नागरिक बचत योजना
> गृहकर्ज परतफेडीतील प्रिन्सिपल रक्कम
> आयुर्विमा पॉलिसीचा प्रीमियम
> राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र
> इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस)
> 80 डी नुसार आरोग्य विम्याचा 15 हजार रुपयांपर्यंतचा प्रीमियम
>80 जी नुसार कोणत्याही संस्थेला दिलेले दान वा देणगी

यावरही मिळते कर सवलत
> 24 बी मध्ये होम लोन रिपेमेंटमधील व्याजाची रक्कम. मर्यादा 1.5 लाख
> 80 ईई नुसार, आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये जर घरासाठी कर्ज घेतले असेल तर काही अटींच्या अधीन राहून याच्या परतफेडीवर व्याज रकमेत जास्तीत जास्त 1 लाख रुपयांची सवलत. ही सवलत 24 बी व्यतिरिक्त आहे.
> 80 ई नुसार उच्च् शिक्षणासाठी घेण्यात आलेल्या शैक्षणिक कर्जाच्या परतफेडीमधील व्याजाच्या रकमेवर सूट.