आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Last Year Fruitful, Investors Richness Increases

सरते वर्ष लाभदायी,गुंतवणूकदारांच्या श्रीमंतीत वाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महागाईचा कडेलोट, आर्थिक मंदी, जागतिक आर्थिक पातळीवरील अनिश्चिततेच्या वातावरणातही नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात भांडवल बाजाराने गुंतवणूकदारांची भरभरून कमाई करून दिली. या वर्षात गुंतवणूकदारांची श्रीमंती 70 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढल्याचे असोचेमने केलेल्या एका अभ्यासात दिसून आले आहे. बाजार भांडवलामध्ये नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात 20 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे.
डिसेंबरमध्ये सेन्सेक्सने 21,483 अंकांची पातळी ओलांडतानाच या वर्षात जवपास 1,653 अंकांची कमाई केली. निफ्टीनेदेखील सरत्या वर्षात 370 अंकांची कमाई करून 6415 अंकांच्या (अगोदरच्या वर्षात 5905) बंद पातळीपर्यंत मजल मारली. राजकीय घडामोडी आणि सुधारणांबाबत अनिश्चिततेचे वातावरणात बाजारात चढ-उतार असतानाही समभाग बाजारपेठेला चालना देण्यामध्ये विदेशी गुंतवणूकदार यांची भूमिका महत्त्वाची ठरली. देशातील मरगळलेल्या गुंतवणूक वातावरणातही विदेशी संस्थांनी गेल्या वर्षात 20 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली; परंतु त्या अगोदरच्या वर्षात 24 अब्ज डॉलरची गुंतवणूक केल्याचे असोचेमचे महासचिव डी. एस. रावत यांनी सांगितले.
नवे वर्ष बाजारासाठी चांगले : या गुंतवणूकदारांनी नुकत्याच संपलेल्या वर्षात औषध, सॉफ्टवेअर, वित्तीय सेवा या क्षेत्रांना जास्त प्राधान्य दिल्याचे रावत यांनी सांगितले.