आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लिपकार्ट उभारणार सहा हजार कोटींचा निधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशातील ऑनलाइन शॉपिंग व्यवसायातील वाढत्या स्पर्धेतही आघाडीवर असलेल्या ‘फ्लिपकार्ट’ या आघाडीच्या कंपनीने गुंतवणूकदारांच्या समूहाकडून सहा हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा विचार केला आहे. परंतु या भागधारणेचा तपशील मात्र कंपनीने जाहीर केलेला नाही.
टायगर ग्लोबल मॅनेजमेंट अँड नॅस्पर्स, अ‍ॅसेल पार्टनर्स, डीएसटी ग्लोबल, आयकोनिक कॅपिटल, मॉर्गन स्टॅन्ले इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, सोफिना इत्यादी काही विद्यमान गुंतवणूकदारदेखील या वित्तपुरवठ्यामध्ये सहभागी होणार आहेत.
बंगळुरूमधील ही कंपनी या निधीचा उपयोग ऑनलाइन आणि मोबाइल सेवा जाळ्याचा विस्तार करणे, संशोधन आणि विकास क्षेत्र बळकट करणे यावर खर्च करणार आहे. परंतु त्याबरोबरच कंपनी अधिग्रहण करण्याच्यादेखील विचारात आहे. देशातील दीर्घकालीन धोरणात्मक गुंतवणुकीसाठी विशेष करून मोबाइल टेक्नॉलॉजीचा विस्तार करण्यासाठी हा निधी उपयोगात आणणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. अद्याप आमचा व्यवसाय स्थिरावला नसल्याने सार्वजनिक समभाग विक्रीचा विचार केला नसल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी
सचिन बन्सल यांनी सांगितले.