आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest Firefox Smartphone Intex Cloud Fx Launched In Indian Market

इंटेक्सने लॉन्च केला फायरफॉक्स OS असलेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन @1999 Rs.

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Intex Cloud FX)
गॅजेट डेस्क - भारतीय स्मार्टफोनमेकर कंपनी इंटेक्सने कंपनीचा पहिला आणि भारतीय स्मार्टफोन मार्केटमधील सर्वात स्वस्त फायरफॉक्स स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Cloud FX नाव असलेल्या या स्मार्टफोनची किंमत केवळ 1999 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. कंपनीच्या एक्सक्लूसिव्ह स्ट्रॅटेजीअंतर्गत हा स्मार्टफोन केवळ Snapdeal.com वर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या फोनच्या लाँचिंगच्या आगोदर कंपनीने 'इंडियाज लोएस्ट प्राइस स्मार्टफोन लॉन्चिंग' या टॅगलाईनसोबत या मोबाईलच्या लॉन्चिंग इव्हेंटची आमंत्रणे पाठवली होती. कंपनीने या वर्षाच्या जूनमध्येच घोषणा केली होती, की कंपनी फायरफॉक्स ओएस असलेला 2000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा स्मार्टफोन बाजारात उतरवणार आहे. फायरफॉक्स ओएसवर चालणारा हा भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे.
दोन दिवसांपूर्वीच स्पाईसने फायरफॉक्स ओएसवर चालणारा स्मार्टफोन Spice Fire One Mi-FX 1 लॉन्च केला होता. या फोनची किंमत 2299 एवढी ठेवण्यात आली आहे. फायरफॉक्समुळे लो बजेट ग्राहकांसाठी अँन्ड्रॉइड ऑपरेटींग सिस्टीम शिवाय अजून दोन नवे प्रकार बाजारात उपलब्ध झाले आहेत.
पुढील स्लाईडवर पाहा, या स्मार्टफोनचे फीचर्स -