(LG G3 Stylus)
गॅजेट डेस्क - LG ने नुकतेच त्यांचा लॅटेस्ट फोन LG G3 चा नवा व्हेरिएंट 'G3 स्टायलस' भारतात लॉन्च केले आहे. कंपनीने या मोबाईलला कोणताही मोठा इव्हेंट न घेता, प्रचार न करता
आपल्या वेबसाईट LG India वर लिस्ट केले आहे. कंपनीने या फोनची किंमत 21500 रुपये एवढी ठरवली आहे.
LG ने या फोनचे ग्लोबली लॉन्चिंग ऑगस्टमध्येच केले होते. सप्टेंबरला हा फोन ब्राझिल, लॅटिन अमेरिका आणि सेंट्रल आशियामध्ये विक्रीसाठी आला होता. आता ऑक्टोबरच्या सुरूवातीला भारतीय मार्केटमध्ये कंपनीने याला लॉन्च केले आहे. हा फोन स्टायलस (स्क्रीनवर काम करण्यासाठी वापरण्यात येणारा रबरचा पेन) सोबत येतो. हे स्टायलस फीचर LG G3 मध्ये नव्हते.
पुढील स्लाईडवर वाचा, या फोनचे फीचर्स...