आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नफावसुलीमुळे तेजीला वेसण; सेन्सेक्स, निफ्टी विक्रमी उच्चांकावरून घसरले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या नऊ दिवसांत एकामागून एक उच्चांकी विक्रम स्थापन करणाऱ्या शेअर बाजाराला गुरुवारी नफावसुलीचा फटका बसला. रिअॅल्टी, धातू, भांडवली वस्तू, ऑटो व बँकिंग समभागांत मोठ्या प्रमाणात नफेखोरी झाल्याने सेन्सेक्स व निफ्टीत घसरण झाली. सेन्सेक्स ५४.०१ अंकांच्या घसरणीसह २६,९७२.३९ वर आला. निफ्टी १८.६५ अंकांनी घटून ८०९५.९५ वर स्थिरावला. निफ्टी ८१०० या महत्त्वाच्या पातळीखाली आला.

मागील नऊ सत्रांत तेजीच्या वारूवर स्वार असलेल्या सेन्सेक्सला नफावसुलीचा चांगलाच फटका बसला. गुंतवणूकदारांनी रिअॅल्टी, धातू, भांडवली वस्तू, ऑटो व बँकिंग समभागांची मोठ्या प्रमाणात िवक्री केली. या विक्रीच्या माऱ्यात भेलचे समभाग ४.४४ टक्क्यांनी घसरले, तर हिंदाल्कोचे शेअर्स ३.४० टक्क्यांनी गडगडले. सेन्सेक्सच्या यादीतील ३० पैकी १९ समभाग घसरले, तर ११ समभाग चमकले. ऑटो समभागांच्या खरेदीने सेन्सेक्सला काही प्रमाणात सावरले. बजाज ऑटो, हीरो मोटोकॉर्पच्या समभागांत चांगली खरेदी दिसूनआली. आशिया व युरोपातील प्रमुख बाजारांत घसरणीचा कल दिसूनआला. युरोपियन सेंट्रल बँकेच्या निर्णयाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे, तेथील व्याजदराबाबत बँक काय पावले टाकते यावर गुंतवणूकदारांचे पुढील गणित ठरणार आहे.
टॉप लुझर्स - टाटा स्टील, टाटा मोटर्स, गेल इंडिया, टाटा पॉवर, इन्फोसिस.
टॉप गेनर्स - बजाज ऑटो, एनटीपीसी, हीरो मोटोकॉर्प, एचडीएफसी
उच्चांकानंतर नफ्यावर भर
उच्चांकी पातळीवर असलेल्या बाजारात नफा पदरात पाडून घेण्यासाठी गुंतवणूकदारांनी विक्रीचा धडाका लावला त्यामुळे घसरण दिसूनआली. आता गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकेतील रोजगारविषयक आकडेवारी व युरोपातील व्याजदरांकडे आहे.
जिग्नेश चौधरी, रिसर्च हेड, व्हेरासिटी सेक्युरिटीज.