आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवडणारी घरे; विमा गुंतवणूकदारांच्या भवितव्याकरिता घातक प्रस्ताव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाजमितीस देशात तीन काेटींपेक्षाही अधिक लाेकांना स्वत:चे घर नाही. या सर्वांना िनवारा देण्याची जबाबदारी ही सरकारची असून लवकरच सर्वांना हक्काचे घर मिळेल, अशी घाेेषणा केंद्रीय नगरविकासमंत्री एम.व्यंकय्या नायडू यांनी नुकतीच लाेकसभेत केली अाहे. तर देशातील नागरीकरणाचा वेग वाढत असल्याने परवडणाऱ्या दरातील घरांचा तुटवडा माेठ्या प्रमाणात जाणवत असून या क्षेत्रात अधिकाधिक िनधी उपलब्ध करून देण्याची अावश्यकता पंतप्रधानांच्या कार्यालयाने व्यक्त केली अाहे. त्यासाठी गृहबांधणीकरिता अर्थसाह्य करणाऱ्या कंपन्यांमध्ये भविष्यनिर्वाह िनधी व विमा कंपन्यांनी अधिक गुंतवणूक करण्याची सूचना पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) केली अाहे. त्यामुळे वीमा क्षेत्रात याचे पडसाद उमटत अाहेत. तेथील गुंतवणूकदार काहीसे संभ्रमीत झाले अाहेत.
१ -स्वस्त घरांसाठीचा प्रस्ताव
सन २०२२ या वर्षांपर्यंत सर्वांना घर व परवडणाऱ्या दरातील घर या याेजनेला गती िमळावी, यासाठी पंतप्रधान कार्यालयाने प्रस्ताव तयार केला असून, सदर प्रस्तावानुसार िवमा कंपन्या व कर्मचारी भविष्य िनर्वाह िनधी संघटनेने त्यांच्याकडे जमा रकमेच्या १५ टक्के रक्कम गृहबांधणीत गुंतवली तर २.३० लाख काेटी रुपयांचा कर्जपुरवठा करता येईल व त्यातून ११.५० लाख नवीन कमी िकमतीची घरे बांधता येऊ शकतील. १५ टक्के िनधीची गुंतवणूक गृहबांधणीत केली नाही तर ग्रामीण पायाभूत िवकास फंडात म्हणजेच नाबार्डच्या कर्जराेख्यात कमी पडलेली रक्कम गुंतवण्यास भविष्य िनर्वाह िनधी संघटनेला व िवमा कंपन्यांना भाग पाडले जाईल, असे ही स्पष्ट करण्यात अाले अाहे.
२ - सरकारी २५ टक्के हिस्सेदारी असलेल्या कंपनीतही गुंतवणूक करावी लागेल
सध्या पी.एफ. व विमा कंपन्यांच्या पैशांची सुरक्षितता त्या ‘ दुहेरी एएए’ रेटिंग असलेल्या हाउसिंग कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.परंतु, अाता त्यांना ‘ एए+’ रेटिंग असलेल्या ज्या िवत्तीय कंपन्यांमध्ये सरकारी कंपन्यांची २५ टक्के िहस्सेदारी अाहे, अशा कंपन्यांमध्येही गुंतवणूक करावी लागेल.
३ -विमा गुंतवणूकदारांचे भवितव्य असुरक्षित
अापले राज्य हे लाेककल्याणकारी राज्य असून कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षिततेच्या अाधारावर कर्मचारी भविष्य निर्वाह िनधी कायदा, १९५२ संसदेने केला अाहे. त्यामुळे भविष्य िनर्वाह िनधीमधील गुंतवणूक ही कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिपश्चात कर्मचाऱ्यांचा अाधार असलेली दीर्घकालीन गुंतवणूक अाहे. त्याचप्रमाणे अायुर्विम्यामधील गुंतवणूक हीदेखील कुटुंबाची भविष्याची तरतूद असलेली दीर्घकालीन गुंतवणूक अाहे. त्यामुळे यामधील गुंतवणूक अत्यंत सुरक्षित राहावी यासाठी संबंधित कायद्यांत सदर पैसा कशामध्ये गुंतवावा यासंबंधी कडक तरतुदी करण्यात अालेल्या अाहेत.