आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Currency Notes Issued Before 2005 To Be Withdrawn RBI

"आरबीआय" 2005 पूर्वी छापलेल्या सर्व नोटा परत घेणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) 2005 पूर्वी छापलेल्या सर्व नोटा परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधी "आरबीआय"ने बुधवारी एक प्रेसनोटद्वारे दिलेल्या माहितीनुसार, 2005 पूर्वीची नाणीसुद्धा परत घेतली जातील. 31 मार्च 2014 पर्यंत आरबीआय सर्व जुन्या नोटांचे सर्क्युलेशन बंद करणार आहे. 1 एप्रिल 2014 पासून जुन्या नोटा बँकामध्ये बदलून दिल्या जातील. जे लोक 1 जुलैनंतर नोटा बदलवण्यासाठी जातील त्यांना 100 किंवा 500 च्या नोटा दहापेक्षा जास्त असतील तर ओळखपत्र (आयडी प्रुफ) दाखवावे लागेल.