आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Google Android One Launched In India

GOOGLE चे तीन 'अँड्रॉईड वन' स्मार्टफोन लॉन्च; किंमत 6399-7000

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(इवेंट दरम्यान स्टेजवर 'अँड्रॉइड वन'ची माहिती देताना गुगलचे सिनिअर व्हाईस प्रेसिडेंट (अँड्रॉइड, क्रोम अँड ऐप्स डिविजन) सुंदर पिचाई)
नवी दिल्‍ली: गुगलने सोमवारी एका इव्हेंटमध्ये लो बजेट स्मार्टफोन सिरिजमध्ये त्यांच्या बहूप्रतिक्षित 'अँड्रॉइड वन' लॉन्च केले. या फोन्ससाठी गुगलने मायक्रोमॅक्स, कार्बन आणि स्पाईस या भारतीय मोबाईल कंपन्यांसोबत करार केला आहे. मायक्रोमॅक्सने कॅनव्हास A1, कार्बनने स्पार्कल V आणि स्पाइसने mi 498 नावाने अँड्रॉईड फोन बाजारात उतरवले आहेत. या सर्व स्मार्टफोन्सची किंमत 6399 रु. ते 7000 रु. रुपयांदरम्यान आहे. अँड्रॉईड वन गुगलची एक विशेष प्रोग्रॅमिंग आहे, ज्यामध्ये गुगल सर्व्हिसेसला कमी किंमतीत चांगले हार्डवेअर देत विकसनशील देशांमध्ये पोहोचवण्याची योजना आहे.
सध्या ऑनलाईनच विकत घेता येऊ शकतात हे फोन
या फोनची विक्री सध्या ऑनलाईनच सुरू आहे. ऑक्टोबरमध्ये हे फोन रिटेल बाजारात उपलब्ध होतील. या स्मार्टफोनला वेगवेगळ्या ई-कॉमर्स वेबसाईटवरून विकत घेता येईल. यांची विक्री सोमवारी 3.30 वाजेपासून सुरू होईल. यामध्ये कार्बन स्पार्कल V स्नॅपडीलवरून, स्‍पाइसचा हँडसेट फ्लिपकार्टवरून तर कार्बनचा स्मार्टफोन अॅमेझॉन इंडियावरून विकत घेता येईल.

काय आहे विशेष
* गुगलतर्फे या मोबाईल्समध्ये सॉफ्टवेअर अपडेट्स मिळेल
* स्‍मार्टफोन्‍समध्ये सर्व गुगलचे अॅप्स असतील
* सर्व अँड्रॉईडवन स्मार्टफोनमध्ये क्वाड-कोर प्रोसेसर देण्यात आले आहे.
* गुगल अनेक नेटवर्क ऑपरेटर्ससोबत टायअप करून स्वस्त डेटा पॅक देणार आहे.
या वेळी भारतात स्मार्टफोन्सचे 80 ब्रँड उपलब्ध आहेत. असे मानण्यात येते की, हे फोन सॅमसंग, क्सिओमी आणि मोटोरोलासमोर चांगले आव्हान उभे करू शकतील.
पुढील स्लाईडवर पाहा, या स्मार्टफोन्सबद्दलची माहिती