आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मारुती, होंडाला ऑगस्ट पावला, इलाइट आय-२०, ग्रँडला प्रतिसाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ऑगस्टमधीलवाहन विक्रीमध्ये मारुती-सुझुकी, होंडा कार्स, ह्युंदाई िनस्सान या कंपन्यांनी बाजी मारली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, टोयोटा, फोर्ड इंडिया, जनरल मोटर्स कंपन्यांची विक्रीची गाडी मात्र अद्याप घसरणीच्या घाटातच आहे. आॅगस्टमधील वाहन विक्रीची आकडेवारी सोमवारी जाहीर झाली. त्यात हा कल दिसून आला.

मारुती सुझुकीच्या विक्रीत ऑगस्टमध्ये २९.३ टक्के वाढ झाली आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये कंपनीने ७६,०१८ वाहने विक्री केली होती. यंदा ९८,३०४ वाहनांची विक्री केली. मारुतीची स्पर्धक असणाऱ्या ह्युंदाई मोटार इंडिया कंपनीच्या विक्रीत १९.२ टक्के वाढ झाली आहे. यंदा कंपनीने ३३,७५० कारची विक्री केली, ऑगस्ट २०१३ मध्ये कंपनीच्या २८,३११ कारची विक्री झाली होती. होंडा कार्स इंिडया िलमिटेडने यंदा ऑगस्टमध्ये १६,७५८ कारच्या विक्रीसह ८८ टक्के वाढ नोंदवली.
सणांचा हंगाम लक्षात घेऊन ह्युंदाईने इलाइट आय-२०, ग्रँड आय-१० या कार बाजारात आणल्या. त्याला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद िदल्याने कंपनीच्या विक्रीत वाढ झाली. राकेशश्रीवास्तव, उपाध्यक्ष(विक्री), ह्युंदाई.

स्विफ्ट, डिझायर, सेलेरिओला मागणी
मारुतीच्या स्विफ्ट, डिझायर, सेलेरिओ, इस्टिलो, िरट्झ या काॅम्पॅक्ट श्रेणीच्या कार विक्रीत ऑगस्टमध्ये ५३.२ टक्के वाढ झाली. अल्टो, ए-स्टार या िमनी प्रवासी कार विक्रीत ८.३ टक्के वाढ नोंदवण्यात आली.
बुलेटची क्रेझ वाढली
राॅयलएन्फील्ड या प्रामुख्याने बुलेट बनवणाऱ्या कंपनीने ऑगस्टमध्ये ६३ टक्के वाढ नोंदवली आहे. कंपनीने यंदाच्या आॅगस्टमध्ये २६,१२१ दुचाकींची विक्री केली. गतवर्षी १५,७०८ दुचाकींची विक्री झाली होती. या आकडेवारीवरून देशात बुलेटची क्रेझ वाढत असल्याचे िचत्र आहे.
महिंद्रा, टोयोटा, फोर्डची गाडी मात्र घटीच्या घाटात