आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चालू खात्याची तूट घटली, एप्रिल-जून तिमाहीत तूट १.७ टक्क्यांवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून तिमाही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगले दिवस घेऊन आली आहे. या तिमाहीत विकासदराने ५.७ टक्क्यांपर्यंत मजल मारली. आता चालू खात्यातील तूट (कॅड) घटून १.७ टक्क्यांवर आली आहे. गेल्या वर्षी याच काळात ही तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) ४.८ टक्के एवढी होती. चालू खात्यातील तूट घटल्याने आयात-निर्यातीतील अंतर कमी होऊन परकीय गंगाजळी वाढण्यास मदत होणार असल्याचे मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले.

निर्यातीत झालेली वाढ घटलेली आयात यामुळे एप्रिल-जून ितमाहीत कॅडमधील तूट कमी झाल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

महागाई कमी होणार. रखडलेले प्रकल्प मार्गी लागणार.
आगामी काळात पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, डाळी या प्रामुख्याने आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमती कमी होण्याची शक्यता.
परकीय चलनाचा ओघ वाढला.

आयात घटल्याने सरकारी तिजोरीवरील खर्चाचा भार कमी होणार.
मागणी-पुरवठ्याचा मूळ सिद्धांत व्यवस्थित काम करत असल्याचे लक्षण.
फायदा काय
चालू खात्यातील तूट : आयातिनर्यात व्यापारातील फरक म्हणजे चालू खात्यातील तूट िकंवा करंट अकाउंट डिफिसिट (कॅड). अर्थात िवदेशी चलनाची आवक आणि जावक यातील फरक या तुटीने मोजला जातो.
सोन्याने तारले
आयातीतआलेल्या मोठ्या घटीमुळे चालू खात्यातील तूट कमी झाली. यात सोन्याचा मोठा वाटा आहे. देशात सोने आयातीचे प्रमाण मोठे आहे. मात्र, सोने आयातीवर सरकारने अनेक निर्बंध लादल्याने त्यास आळा बसला. एप्रिल-जून कालावधीत देशातील सोने आयातीत ५७.२ टक्के घट झाली.