मुंबई - स्थानिक व जागतिक पातळीवरील विविध घडामोडींमुळे बाराव्या पंचवार्षिक योजना कालावधीत आर्थिक विकासदर निर्धारित 8 टक्क्यांच्या तुलनेत सरासरी 6 टक्क्यांपेक्षा जास्त वाढणार नाही असा अंदाज व्यक्त केला आहे.
नियोजन आयोगाच्या ताज्या अंदाजानुसार बाराव्या पंचवार्षिक योजना कालावधीत आर्थिक विकासदराची वार्षिक सरासरी वाढ सहा टक्क्यांपेक्षा जास्त राहणार नसल्याचे म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले. बाराव्या पंचार्षिक योजना कालावधी सध्या मध्यावधी मूल्यांकन प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
उत्पादन क्षेत्राची खराब कामगिरी हे आर्थिक वाढ मंदावण्याचे प्रमुख कारण असून निर्यातीचे घटते प्रमाण आणि अन्य जागतिक घडामोडीदेखील कारणीभूत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.