आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चांगल्या सेवेसाठी मोबाइल कंपन्यांच्या नव्या युक्त्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मोबाइल बाजारपेठेत एकीकडे स्वस्तात स्वस्त स्मार्टफोन आणण्याची स्पर्धा रंगलेली असतानाच दुसऱ्या बाजूला आपल्या ग्राहकाला अधिकाधिक चांगल्या सेवा मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करीत आहेत. हेच बघाना एअरटेल कंपनीने १७ लाख गाणी डाऊनलोड होऊ शकतील असा ‘एअरटेल विंक’ म्युझिक अॅप दाखल केले आहे, तर एअरसेल या कंपनीने आपल्या इंटरनेट पॅकेजमध्ये फेसबुक आणि व्हॉटसअॅप ‘चकटफू’ दिले आहे.

स्मार्टफोनचा वापर जितका वाढू लागला आहे ततिकेच त्याच्या जोडीला जाता-येता संगीत ऐकण्यासाठीदेखील मोबाइलला महत्त्व येऊ लागले आहे. एकूण डिजिटल वापराच्या जवळपास ८५ ते ९० टक्के आहे. ‘विंक’ अॅपद्वारे ग्राहकांना संगीताचा नवा अनुभव घेता येऊ शकेल, असे कंपनीच्या ग्राहक विभागाचे संचालक श्रीनिवासन गोपालन यांनी सांगतिले. विंक या अनोख्या अॅपमध्ये २४ बाय ७ संगीताच्या तालावर थिरकता येणार आहे. अॅपमध्ये प्रत्येक मूडला साजेल अशी गाणी आहेत.
‘विंक’ अॅपची वैशिष्ट्ये
हिंदी, पंजाबी, भोजपुरी यांसारख्या आठ भाषांमधील १७ लाख गाण्यांचा संग्रह.
शुल्क
विंक प्लस - अँड्रॉइडवर ९९ रु., तर आयओएसवर ६० रुपयांत अमर्याद गाणी डाऊनलोड.
हिंदी इंटरफेसचा सुलभ पर्याय

कोणत्याही जाहिरातीशिवाय संगीताचा आनंद
कोणत्याही मोबाइल ऑपरेटरच्या नेटवर्कसाठी ‘विंक’अॅप अनुकूल
विंक फ्रीडम : अँड्रॉइड वापरणाऱ्या एअरटेल ग्राहकांसाठी २९ रुपये विशेष दर, एअरटेल थ्रीजीसाठी १२९ रु वर्गणी.
ग्राहकांचा फायदा
> टूजी, थ्रीजी, फोरजी किंवा वाय-फायवरून विंक डाऊनलोड करणे शक्य
> अॅप आणि मोबाइल वेबसाइटवर कोणत्याही शुल्काविना चकटफू

नेटवर व्हॉटसअँप फेसबुक मोफत
एअरसेल या आघाडीच्या कंपनीने आपल्या सर्व इंटरनेट पॅकेजवर फेसबुक आणि व्हॉटसअँप मोफत देऊ केले आहे. हा खास ‘साेशल पीआय पॅक’ असून त्याची किंमत १४ ते २६ रुपये असून वैधता १४ ते २८ दिवस आहे. फेसबुक, व्हॉटसअँप वापरण्यासाठी दोन महिन्यांसाठी प्रतिमहिना १०० एमबी याप्रमाणे डेटा मिळेल. विद्यमान ग्राहकांना १० एमबी डेटा मिळणार आहे.