आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परतावा देण्यात सेन्सेक्स अव्वल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अमेरिका,युरोप, आफ्रिका आणि संपूर्ण आशियातील शेअर बाजारांना मागे टाकत भारतीय शेअर बाजाराने परतावा देण्यात अव्वल क्रमांक िमळवला आहे. भारतीय शेअर बाजारातील तेजी आगामी काळातही सुरूच राहील, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला असून दीर्घकाळासाठी भारतीय शेअर बाजार अजूनही आकर्षक अाहे. यंदाचेच लक्षात घेतले तर सेन्सेक्सने सुमारे २००० अंकांची वाढ दर्शवली आहे.

ग्लोबलसंस्थांचे भारताबाबत मत
माॅर्गनस्टॅनलीच्या मते, आगामी १२ महिन्यांच्या कालावधीत भारताची सार्वभौम रेटिंग िस्थर राहील. सरकारकडून खर्चात कपात करण्यासाठी िनर्णायक वेळेवर कार्यवाही, उत्पादकतेस अनुरूप ग्रामीण वेतनातील वाढ कमी आणि विजेवरील अनुदान कमी केल्याने देशाचे पतमानांकन वाढू शकते. भारतातील महागाई घटून ६.५ टक्क्यांवर येण्याची शक्यता माॅर्गन स्टॅनलीच्या आर्थिक टीमने व्यक्त केली आहे.
विदेशी इंडेक्स १ महिन्यांत ३ महिन्यांत ६ महिन्यांत वर्षात
डाऊ जोन्स (अमेरिका) 3.07% 2.04% 4.39% 15.13%
एफटीएसई (युके) 2.96% 0.70% 2.61% 6.41%
सीएसी (फ्रान्स) 4.41% -2.23% 2.62% 10.80%
डीएएक्स (जर्मनी) 4.84% -3.25% 2.55% 0.30%
िनक्कई (जपान) 1.30% 3.96% 3.68% 11.54%
शांघाई (चीन) 3.76% 13.18% 11.16% 9.93%
हँगसँग (हाँगकाँग) 2.91% 9.59% 11.59% 13.43%
तैवान (तैवान) 1.06% 3.15% 8.21% 16.64%
कोस्पी (द. कोरिया) -1.16% 2.37% 4.66% 6.34%
जकार्ता (इंडोनेशिया) 3.32% 7.17% 11.85% 30.76%
जेएसई एफटीएसई (द. अफ्रिका) 1.50% 3.61% 9.47% 21.62%