आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Sun Pharma To Buy Struggling Ranbaxy

अडचणीतील रॅनबॅक्सी सन फार्मा घेणार ताब्यात, 19 हजार कोटी रूपयांत झाला सौदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - औषधांच्या दर्जाविषयक नियमांची पूर्तता न केल्यामुळे सध्या अमेरिकेची औषध क्षेत्रातील अग्रणी रॅनबॅक्सी लॅबोरेटरीज ही कंपनी निर्यात बंदीमुळे अडचणीत सापडली आहे. परंतु त्याच वेळी सन फार्मा या कंपनीने रॅनबॅक्सी ही कंपनी खरेदी करण्याचे जाहीर केले आहे. संपूर्ण समभाग व्यवहारातून होणार्‍या या कंपनी खरेदीचे मूल्य 3.2 अब्ज डॉलर (19 हजार कोटी रूपये) आहे. रॅनबॅक्सी ताब्यात आल्यानंतर ही जगातील पाचवी सर्वात मोठी विशेष जेनरिक कंपनी ठरणार आहे. भारतातीलदेखील सर्वात मोठी औषध कंपनी बनणार असल्याचे या दोन्ही कंपन्यांनी म्हटले आहे.
दर्जात्मक नियमांची पूर्तता न केल्याबद्दल अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने रॅनबॅक्सीच्या भारतातील सर्व चार प्रकल्पांवर औषध उत्पादनांची अमेरिकेला निर्यात करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याच्याच जोडीला चांगल्या उत्पादनविषयक नियमांचा भंग केल्याबद्दलही कंपनीच्या कारखाडी प्रकल्पावरदेखील अमेरिकेला उत्पादनांची निर्यात करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सन फार्माने सोमवारी जाहीर केलेल्या करारांतर्गत रॅनबॅक्सीच्या समभागधारकांना रॅनबॅक्सीच्या प्रत्येकी एका समभागासाठी सन फार्माचे 0.8 समभाग मिळणार आहेत. याचे मूल्य रॅनबॅक्सीच्या प्रत्येक समभागासाठी 457 रुपये आहे. रॅनबॅक्सीच्या 30 दिवसांच्या सरासरी समभाग किमतीवर 18 टक्के अधिमूल्याने आणि रॅनबॅक्सीच्या 60 दिवसांच्या सरासरी समभाग किमतीला 24.3 टक्के अधिमूल्याने देण्यात येणार आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये व्यवसाय बंद केल्याची तारीख चार एप्रिल असेल. एकूण समभाग मूल्य व्यवहार हा 3.2 अब्ज डॉलर असल्याचे दोन्ही कंपन्यांनी एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे.