आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News, Oil Companies Set To Cut Diesel Prices Soon

पेट्रोलनंतर डिझेलही होणार स्वस्त, लवकरच देशातील जनतेला मिळेल खुशखबर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील सामान्य जनतेला लवकरच खुशखबर म‍िळणार आहे. पेट्रोलनंतर आता डिझेलच्या दरात कपात करण्‍याची तयारी तेल कंपन्यांनी सुरु केली आहे. त्यामुळे आधीच महागाईने पिचलेल्या जनतेला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

कच्च्या तेलाच्या किंमतीत मागील 14 महिन्यांपासून सातत्याने वाढ होत होती. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 102 डॉलरवर पोहोचले होते. या पार्श्वभूमीवर भारतीय तेल कंपन्यांना नाइलाजास्तव तोटा भरून काढण्यासाठी इंधनाच्या दरात वाढ केली होती. सद्यस्थितीत तेल कंपन्यांना डिझेलच्या दरात प्रति लीटर एक रुपया 78 पैसे तोटा सहन करावा लागत आहे. गेल्या जुलैमध्ये हा तोटा दोन रुपये 50 पैसे प्रति लीटर होता.
दरम्यान, केंद्र सरकारने जून 2010 पासून डिझेलच्या दरांवरील नियंत्रण हटवल्यानंतर डिझेलच्या दरात प्रत्येक महिन्याला 50 पैशांने वाढ करण्यात येत आहे.
जगभरात कच्च्या तेलाचे दर एक डॉलरने घसले आहे. त्यामुळे भारताच्या निर्यात खर्चात सुमारे 6000 कोटी रुपयांची कपात झाली आहे.