मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकारला सत्तेत येऊन शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. गेल्या अडीच वर्षांत झाले नाही ते शंभर दिवसांत करून दाखवल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. दुसरीकडे शेअर बाजारात तेजी कायम आहे. सेंसेक्स आणि निफ्टीने मंगळवारी ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे.
सेंसेक्सने सलग आठव्या सत्रात 27000 अंकांचा टप्पा ओलांडला आहे तर निफ्टीने 8100 अंकांचा टप्पा पार करून ऐतिहासिक विक्रम नोंदवला आहे. शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून तेजी कायम असल्याने गुंतवणुकदारांना अच्छे दिनाचा प्रत्यय आला आहे.
एक्साइड इंडस्ट्रीज, मारुती, श्रीराम ट्रान्सपोर्ट, सेंच्युरी टेक्सटाइल्स, अपोलो टायर आणि TFCI मध्ये गुंतवणूक करून मोठा फायदा उचलण्याची नामी संधी चालून आल्याचे बाजार विशेषज्ज्ञांनी म्हटले आहे.
काय म्हणतात विशेषज्ज्ञ...
kyaboltamarket.com चे गौरव रानाडे यांच्यामते...
एक्साइड इंडस्ट्रीज
लक्ष्य 172
स्टॉपलॉस 162
मारुती
लक्ष्य-2960
स्टॉपलॉस 2870
आर.के.ग्लोबलचे राकेश बन्सल यांच्यामते गुंतवणुदारांनी श्रीराम ट्रान्सपोर्ट आणि सेंच्युरी टेक्सटाइल्समध्ये गुंतवणूक केल्यास मोठी नफा कमवता येऊ शकतो.
श्रीराम ट्रान्सपोर्ट
लक्ष्य- 1000
स्टॉपलॉस 900
सेंच्युरी टेक्सटाइल्स
लक्ष्य- 640
स्टॉपलॉस 588
वेव स्ट्रॅटजीचे संतोष कुमार सिंह यांनी अपोलो टायर आणि TFCI मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
अपोलो टायर
लक्ष्य-190
स्टॉपलॉस-174
TFCI
लक्ष्य-45
स्टॉपलॉस-40.30