आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest Selife Smartphone Xperia C3 Launched In India

सोनीने लॉन्च केला सेल्फी शौकीनांसाठी 'Xperia C3', 5 Mp फ्रन्ट कॅमेर्‍यासोबत फ्लॅशसुध्दा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Sony Xperia c3)
गॅजेट डेस्क - जापानची जगप्रसिध्द इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सोनीने आतापर्यंतचा सर्वात चांगला सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन एक्सपेरिया C3 भारतीय मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. कंपनीने या स्मार्टफोनची किंमत 23,990 रुपये एवढी ठेवली असून ग्राहकांना हा फोन सोमवार 1 सप्टेंबरपासून विकत घेता येईल.
मादीस महिन्यात ग्लोबली लॉन्च झालेल्या सोनी एक्स्पेरिया C3 आपल्या फ्रन्ट कॅमेर्‍यामुळे खुपच चर्चेत आला. या फोनचे विशेष म्हणजे याचा 5 मेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेरा जो 25 mm एवढा रुंद आहे. त्याचबरोबर या कॅमेर्‍यासोबत सॉफ्ट LED फ्लॅशची सुविधाही देण्यात आली आहे. सोनी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या फोनमधून 80 डिग्रीचे फील्ड व्यू मिळते. सामान्यतः इतर स्मार्टफोनमध्ये लहान अँगलचे कॅमेरे असतात. या अँगलमुळे फोटोंच्या दर्जावर फरक पडतो.
सेल्फी कॅमेर्‍यासोबतच या मोबाईलचे अजून एक विशेष म्हणजे या फोनमध्ये डबल टॅप क्लीक, स्माईल शटर यांसारखे फीचर्स देण्यात आलेले आहेत. टेक वेबसाईट cnet नुसार स्माईल शटर फीचर ऑन करताच फोन युजर्सच्या चेहर्‍यावर फोकस करून आपोआप क्लीक करतो. मात्र यासाठी युजरला हसावे लागेल.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या या फोनचे इतर फीचर्स...