आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने स्वस्त, रुपयाला तरतरी; सेन्सेक्स 26 हजारांवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली, मुंबई - विदेशी मुद्रा विनिमय बाजारात बुधवारी रुपयाने डॉलरची चांगली धुलाई केली. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 7 पैशांनी वाढून 60.06 झाले. रुपयाचा हा दोन आठवड्यांचा उच्चांक आहे. तिकडे सराफा बाजारात मात्र मागणीअभावी मौल्यवान धातूच्या किमती घसरल्या. राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 150 रुपयांनी स्वस्त होऊन 28,200 झाले. तर चांदी किलोमागे 400 रुपयांनी वाढून 44,800 झाली.
सराफा व्यापार्‍यांनी सांगितले, जागतिक सराफा बाजारातील नकारात्मक कल आणि देशातील स्टॉकिस्ट व रिटेलर्सकडून घटलेली मागणी याचा दबाव सोन्याच्या किमतीवर दिसून आला. सणांचा हंगाम तोंडावर असतानाही जागतिक कल नकारात्मक असल्याचा फटका सोन्याला बसत आहे. न्यूयॉर्क सराफा बाजारात सोने औंसमागे (28.34 ग्रॅम) 0.36 टक्क्यांनी घसरून 1298.80 डॉलर झाले. औद्योगिक क्षेत्राकडून चांगली मागणी आल्याने चांदी मात्र वधारली.
रुपयाचा उच्चांक : बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 7 पैशांनी वाढून 60.06 झाले. रुपयाचा हा दोन आठवड्यांचा उच्चांकी स्तर आहे. शेअर बाजारातील तेजी आणि निर्यातदारांकडून झालेली डॉलरची विक्री याचा लाभ रुपयाला झाला.

पुढील स्लाइडमध्ये, सेन्सेक्स 26 हजारांवर