( फोटो: BlackBerry Passport)
स्मार्टफोन मेकर कंपनी 'ब्लॅकबेरी'ने
आपला पहिला 'स्क्वेयर शेप'
स्मार्टफोन लॉन्च केला आहे. 'BlackBerry Passport' असे या मॉडेलचे नाव आहे. स्क्वेयर शेपमुळे 'BlackBerry Passport' चा सध्या चर्चा सुरु आहे.
'ब्लॅकबेरी'ची विस्कटलेली घडी सुधारण्यासाठी 'BlackBerry Passport' कडून कंपनीला खूप अपेक्षा आहे. ब्रिटेन, अमेरिका, फ्रांस, जर्मनी आणि कॅनडामध्ये सध्या हा फोन लॉंच झाला असून लवकरच भारतीय बाजारात हा फोन लॉन्च होणार आहे.
अमेरिकनेत 'BlackBerry Passport'ची किमत $599 (जवळपास 36, 581 रुपये) आहे.
ऑक्टोबरच्या दुसर्या आठवड्यात हा फोन भारतात येण्याची शक्यता आहे. फोनची लॉन्चिंग तारीख समजू शकली नाही.