आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest Update Intex About To Launch Firefox Smartphone, Spice Launched Fire One

भारतीय बाजारात येणार सर्वात स्वस्त स्मार्टफोन, 25 ऑगस्टला होणार लॉन्च

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: इंटेक्स फायरफॉक्स स्मार्टफोन

गॅजेट डेस्क - ग्राहकांना स्वस्तात स्वस्त स्मार्टफोन देण्यासाठी प्रत्येक स्मार्टफोन कंपनी प्रयत्न करत आहे. अशामध्येच इंटेक्स या स्मार्टफोन कंपनीने लो बजेट ग्राहकांसाठी केवळ 2000 रुपयांपेक्षाही कमी किंमतीतील स्मार्टफोन देण्याची घोषणा केली आहे. इंटेक्सने Cloud FX। नावाचा हा स्मार्टफोन 25 ऑगस्टला बाजारात उतरवणार आहे. कंपनीने 'इंडियाज लोएस्ट प्राइस स्मार्टफोन लॉन्चिंग' या टॅगलाईन सोबत या लॉन्चिंग इव्हेंटच्या आमंत्रण पत्रिका पाठवल्या आहेत. कंपनीने या वर्षाच्या जूनमध्येच घोषणा केली होती, की कंपनी फायरफॉक्स ओएस असलेला 2000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा स्मार्टफोन बाजारात उतरवणार आहे.
या फोनचे स्पेसिफिकेशन
* 3.5 इंच स्क्रीन
* 1 GHz प्रोसेसर
* 2 मेगापिक्सल रेअर कॅमेरा
* वाय फाय
* ब्लूटूथ कनेक्टिविटी
याशिवाय इतर फीचर्सबद्दल लॉन्चिंगच्या वेळेस सांगण्यात येणार आहे.
नुकतेच स्पाईसने 2299 रुपयांमध्ये फायरफॉक्स स्मार्टफोन Fire One Mi-FX 1 लॉन्च केला होता. मात्र इंटेक्सचा स्मार्टफोन 2000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी मोझिला कंपनीने फायरफॉक्स ऑपरेटींग सिस्टीम असणारा लो बजेट स्मार्टफोन केवळ 25 डॉलर (जवळपास 1500 रुपये) मध्ये लॉन्च केला होता. मात्र भारतात हा स्मार्टफोन उपलब्ध नाही.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, भारतीय स्मार्टफोन बाजारातील इतर सर्वात स्वस्त स्मार्टफोन्स बद्दल