आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest Xiaomi Again Will Bring 20,000 Mi3 Handsets To Flipkart On 26th August

बहूचर्चीत Xiaomi Mi3 च्या 20,000 हॅन्डसेट्सची आज flipKart वर होणार विक्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - चीनी अ‍ॅपल म्हणून प्रसिध्द असलेला Xiaomi चा Mi3 या स्मार्टफोनची सध्या बरीच चर्चा आहे. मागील दोन स्टॉक काही सेकंदातच विक्री गेल्यानंतर आज (मंगळवार, 26 ऑगस्ट) पुन्हा Mi3 च्या 20,000 हॅन्डसेट्सच्या स्टॉकची विक्री फ्लिपकार्टवर होणार आहे. या स्मार्टफोनची फ्लॅश विक्री आज दुपारी 2 वाजता फ्लिपकार्टच्या वेबसाईटवरून होईल.
Mi3 च्या फ्लिपकार्टसोबतच्या एक्सक्लूसिव्ह स्टॅटजीवर अनेकांनी टीका केली आहे. Mi3 ची जेवढी मागणी आहे, तेवढा स्टॉक निर्माण करणे कंपनीला शक्य नाही, त्यामुळे सर्व ग्राहकांपर्यंत हा स्मार्टफोन पोहोचत नाही. यामुळे ग्राहकांना या स्मार्टफोनची बरीच वाट पाहावी लागत आहे. शिवाय, या स्मार्टफोनची इतर वेबसाईटवर अव्वाच्या सव्वा दरांमध्ये विक्री होत आहे.
फ्लिपकार्टने सांगितले की, Xiaomi mi3 स्मार्टफोनसाठी आमच्याकडे 100000 पेक्षा जास्त नोंदणी झाली आहे. त्यामुळे केवळ 20,000 हॅन्डसेटमुळे अनेक ग्राहकांना पुन्हा निराश व्हावे लागणार आहे. फेसबुकच्या अधिकृत पेजवर कंपनीने या स्मार्टफोनच्या इतर एक्ससरीजही फ्लिपकार्टवर उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. यामध्ये 559 रु. चे फ्लिपकव्हर आणि 179 रुपयांचे स्क्रीनगार्ड यांचा समावेश आहे.
मागील चौथ्या स्लॉटमध्येही हा फोन काही मिनिटातच संपला होता. 13 ऑगस्ट या स्मार्टफोनचा 20,000 चा चौथा स्टॉक काही सेकंदातच विकला गेला. तर 5 ऑगस्टला आलेल्या या मोबाईलचा तिसरा स्लॉट फ्लिपकार्ट या वेबसाईटवर केवळ 2 सेकंदातच संपला होता.मागील वेळाला या कंपनीने 15,000 मॉडेलची विक्री केली होती. firstpost ने दिलेल्या आकड्यांनुसार 22 जुलैला (mi 3 लॉन्च डेट) पासून आतापर्यंत कंपनीने 35000 हॅन्डसेट विकले आहेत. या फोनची किंमत 13999 रुपये असून यामधील स्पेसिफिकेशनगुगल नेक्सस 5, गॅलक्सी S4 आणि एक्स्पेरिया Z या स्मार्टफोन्स प्रमाणे आहेत.

कमी किंमतीत चीनी स्मार्टफोन गॅलक्सी आणि एक्स्पेरिया यांसारख्या हाय रेंज स्मार्टफोन्सप्रमाणे फिचर देत असल्याने Mi3 भारतात जास्तच लोकप्रिय होत आहे. Xiaomi mi 3 च्या फीचर्समध्ये 13 मेगापिक्सलचा रेअर कॅमेरा आणि फुल एचडी 5 इंचाची डिस्प्ले स्क्रीन देण्यात आली आहे.

पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या... या मोबाईलचा स्पेसिफिकेशन REVIEW...