आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest Xiaomi Redmi 1s Smartphone Launced In India @Rs 5999

Mi3 च्या यशानंतर Xiaomi ने लॉन्च केला RedMi 1S स्मार्टफोन; किंमत @5999

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(RedMi 1S)

गॅजेट डेस्क
- चीनी अ‍ॅपलच्या नावाने प्रसिध्द असलेल्या Xiaomi कंपनीने mi3 स्मार्टफोनने भारतात चांगलीच धुमाकूळ घातली असताना कंपनी आता आपला दुसरा स्वस्त स्मार्टफोन RedMi 1S भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन पहिल्या फ्लॅशमध्ये 5999 रुपयांमध्ये मिळणार आहे. यापूर्वी या फोनची किंमत 6999 एवढी सांगण्यात आली होती. या फोनची पहिली फ्लॅश विक्री 2 सप्टेंबरला होणार आहे.
नुकतेच Mi3 ला भारतात मिळालेल्या उद्दंड प्रतिसादामुळे चीनी स्मार्टफोन मेकर Xiaomi भारतातील स्मार्टफोन उद्योगातला एक मोठा खेळाडू म्हणून ओळखला जात आहे. एकीकडे मायक्रोमॅक्स लो बजेट स्मार्टफोनसाठी प्रसिध्द असताना भारतात Mi3 सारखा हायरेंज स्मार्टफोन लो बजेटमध्ये सादर करून Xiaomi ने भारतीय बाजारपेठेत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे Xiaomi च्या या नव्या Redmi 1s ला भारतीय ग्राहक कशा प्रकारे रिस्पॉन्स देतात ते पाहणे औत्सूक्याचे आहे.
फ्लिपकार्टवर झाला लॉन्च
Xiaomi चा हा नवा स्मार्टफोनसुध्दा Mi3 प्रमाणेच फ्लिपकार्टवरून विकत घेतला जाऊ शकतो. Redmi 1s फ्लिपकार्टवर दिसत जरी असला तरी त्यावर कमिंग सुन असाच टॅग लावण्यात आला आहे. फ्लिपकार्टवर या फोनची किंमत 6999 एवढी दाखवण्यात येत आहे.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या Xiaomi च्या या नव्या RedMi 1S स्मार्टफोनचे फीचर्स...