फोटो - आयरिस X5
गॅजेट डेस्क - वाढत्या सेल्फी ट्रेंडकडे पाहता लावा मोबाईलने कार्बनप्रमाणेच सेल्फी सेंटर्ड स्मार्टफोन लॉन्च केला आहे. आयरीस x5 सेल्फी या स्मार्टफोनमध्ये 5MP एवढ्या क्षमतेचा फ्रन्ट कॅमेरा दे्ण्यात आला आहे. एवढंच नाही तर या फ्रन्ट कॅमेर्यासोबत लावाने LED फ्लॅशचीही सुविधा दिली आहे. यामुळे अत्यंत कमी प्रकाशातही हा फोन एक चांगल्या प्रकारचा सेल्फी देऊ शकतो.
या मोबाईलचा रेअर कॅमेरा 8 मेगापिक्सल एवढ्या क्षमतेचा असून या स्मार्टफोनची किंमत कंपनीने 8799 रुपये एवढी ठेवली आहे. अँड्रॉईड किटकॅट ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारा हा स्मार्टफोन कार्बनच्या नव्या टायटेनियम S9 या सेल्फी स्मार्टफोनला चांगली स्पर्धा देऊ शकतो. लावाच्या आयरिस X5 ची स्क्रीन फुल HD आहे.
फीचर्स-
* 5 इंचाची IPS डिस्प्ले स्क्रीन
* 1280*720 पिक्सलचे रेझोल्यूशन
* 1.2 GHz क्वाड-कोर प्रोसेसर
* 1 GB रॅम
* 8 GB इंटरनल मेमरी
* 8 मेगापिक्सल रिअर कॅमरा
* BSI सेंसर-2
* फुल HD व्हिडियो रिकॉर्डिंग
* 30 प्रेम्स प्रति सेकंदच्या वेगाने व्हिडीओ रेकॉर्डिंग
* ब्लूटूथ 4.0
* वाय-फाय, A-GPS, मायक्रो यूएसबी पोर्ट
* 2100 mAh बॅटरी
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, भारतीय मार्केटमधील इतर TOP 10 सेल्फी स्मार्टफोन