आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Leaked Photos Of Apple Iphone 5s Spread On Internet

LEAKED: नवा आयफोन राहणार स्वस्‍त आणि बहुरंगी, इंटरनेटवर पसरले फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाईल हॅण्‍डसेटच्‍या क्षेत्रात अ‍ॅपलच्‍या आयफोनने क्रांती आणली. आयफोन लॉंच झाल्‍यानंतर स्‍मार्टफोनची संकल्‍पनाच बदलून गेली. आयफोन हा ख-या अर्थाने एक आयकॉनिक फोन ठरला. या फोनचे नाव घेताच डोळ्यासमोर अतिशय स्‍टाईलिश आणि शुभ्र किंवा करड्या रंगाचा मोबाईल डोळ्यासमोर येतो. दुसरी गोष्‍ट चटकन लक्ष वेधते ती म्‍हणजे किंमत. आता हा आयकॉनिक फोन नव्‍या स्‍वरुपात लॉंच होणार आहे. याचे खास वैशिष्‍ट्य म्‍हणजे, नवा आयफोन आधीच्‍या मॉडेल्‍सपेक्षा बराच स्‍वस्‍त राहणार आहे. दुसरी बाब म्‍हणजे, हा फोन विविध रंगांमध्‍ये उपलब्‍ध होणार आहे. बहुरंगी आयफोनची छायाचित्रे इंटरनेटवर पसरली आहेत. त्‍यावरुन चर्चेला उधाण आले आहे.

जुलैमध्‍ये 'आयफोन 5 s' लॉंच होणार असल्‍याची चर्चा आहे. हा फोन स्‍वस्‍त राहील तसेच जास्‍त स्‍टायलिश राहणार असल्‍याचा अंदाज आहे. खरे काय ते लवकरच कळेल. परंतु, सध्‍या या फोनचे फोटो इंटरनेटवर मोठ्या आवडीने पाहण्‍यात येत आहेत.

नव्‍या आयफोनबद्दल जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईडवर...