आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lenovo Is Planning To Launch Smartphone In Less Then 5000

लेनोव्‍हो करणार धमाका: लॉंच होणार 5 हजारापेक्षा कमी किंमतीचा स्‍मार्टफोन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉम्‍प्‍युटर क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी लेनोव्‍हो मोठा धमाका करण्‍याची तयारी करीत आहे. पर्सनल कॉम्‍प्‍युटरनंतर लेनोव्‍हो आता स्‍मार्टफोनची विक्री वाढवण्‍याचा विचार करीत आहे.

यावर्षी भारतात एक मिलियन स्‍मार्टफोन विक्री होण्‍याची कंपनीला अपेक्षा आहे. ही योजना यशस्‍वी होण्‍यासाठी कंपनीकडून मोठया प्रमाणात प्रयत्‍न होताना दिसतात. त्‍यासाठी आता कंपनीने पुढचे पाऊल टाकले असून पाच हजारापेक्षा कमी किंमत असलेला स्‍मार्टफान लॉंच करण्‍याची तयारी त्‍यांनी सुरू केली आहे.

वेगवेगळया रेंजचे स्‍मार्टफोन लॉंच करण्‍याची कंपनी तयारी करीत आहे. प्रत्‍येक प्रकारच्‍या ग्राहकांसाठी फोन उपलब्‍ध करून देण्‍याचा कंपनीचा प्रयत्‍न आहे. गेल्‍याकाही दिवसांपासून लेनोव्‍होच्‍या कॉम्‍प्‍युटर्सची विक्री कमी होत चालली आहे. आपले वाढते नुकसान पूर्ण करण्‍यासाठी कंपनी स्‍मार्टफोनच्‍या बाजारपेठेत उतरत असल्‍याचे बोलले जाते.

उल्‍लेखनीय म्‍हणजे भारतीय बाजारात लेनोव्‍हो पीसीच्‍या युजर्समध्‍ये 3.5 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. तरीसुद्धा कंपनी तोटयात आहे. आपला फोन लोकप्रिय करण्‍यासाठी कंपनी मार्केटिंग आणि जाहिरातींवर जास्‍त लक्ष देणार आहे. यासाठी मोठया प्रमाणात पैसा खर्च करण्‍याची कंपनीने तयारी केलेली आहे.

लेनोव्‍हो आपला स्‍मार्टफोन कधी लॉंच करणार आहे याची माहिती नाही. परंतु, लॉंच झाल्‍यानंतर अनेक स्‍मार्टफोन उत्‍पादक कंपन्‍यांना हा चिंतेचा विषय असेल.