Lenovo कंपनीने
आपला पहिला ऑक्टा-कोर प्रोसेसरवर आधारित लेअर डिझाइन
स्मार्टफोन 'VIBE X2' गुरुवारी लॉन्च केला. नवी दिल्लीत झालेल्या इव्हेंटमध्ये जेडी हॉवर्ड (हेड स्मार्टफोन्स डिव्हिजन आशिया पॅसिफिक झोन, लेनोवो) आणि सुनील माथुर (लेनोवो इंडिया हेड) यांच्या उपस्थित Lenovo चा VIBE X2 स्मार्टफोन सादर करण्यात आला. गेल्या सप्टेंबरमध्ये झालेल्या IFA 2014 इव्हेंटमध्ये ग्लोबली लॉन्च करण्यात आला होता.
Lenovo कंपनीने आपला नवा स्मार्टफोन 'लेअर फोन' या नावाने म्हणून प्रमोट करत आहे. या फोनच्या साइड बॉडीमध्ये तीन वेगवेगळ्या रंगाचे लेअर्स दिसतात. याशिवाय या लेअर्स बॅटरी आणि स्पीकर्ससाठी देण्यात आल्या आहेत.
उल्लेखनिय म्हणजे लेनोवोच्या नव्या स्मार्टफोनला स्वतंत्र बॅटरी जोडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दोन बॅटरी बसवल्यामुळे फोन चांगला बॅकअप देईल, असे तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे.
लेनोवोने या फोनसोबत खास JBL स्पीकर्स देखील लॉन्च केले आहेत. स्पीकर्स फोनशी कनेक्ट करता येतात. त्यामुळे हा फोन उत्तम साउंड क्वॉलिटी देतो, नवे फीचर्स असलेला लेनोवोचा हा पहिलाच फोन आहे. लेनोवोच्या नव्या फोनची भारतीय बाजारात किमत किती असेल याविषयी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
लेनोवोचा VIBE X2 हा फोन 13 मेगापिक्सलच्या ऑटोफोकस रिअर कॅमेर्याने अद्ययावत आहे. विशेष म्हणजे फोनचा लूक स्टायलिश आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, VIBE X2 चे स्मार्ट फीचर्स...