आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपण सावरू आपला रुपया, दोष आपलाच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजची आपली आयात-निर्यातीतली तुट यांस बहुतांश कारणीभूत आहे. चालू खात्यातील तूट विकासदराच्या (जीडीपी)च्या सहा टक्क्यांवर गेली आहे. त्यांतून रुपयांचे अवमूल्यन होऊन डॉलर वधारण्याचा धोका वाढला आहे.


आता आपल्याकडे आयातीला पूरक
सहा महिने पुरेल एवढीच गंगाजळी

रुपया 62 रुपयांपर्यंत खाली जाईल असे अंदाज व्यक्त केले जात होते आता तर रुपया प्रतिडॉलर 70 रुपयांच्याही खाली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचे वाईट परिणाम आपल्यावर होण्याची भीती अर्थतज्ज्ञ व्यक्त करू लागले आहेत. पेट्रोल, डिझेल, कोळसा, इंधन यांच्या किमती वाढल्याने महागाई वाढेलच व त्या बरोबर गुंतवणुकीवरचा खर्च वाढून गुंतवणुकीची वाढ कमी होईल. उत्पादन घटून आर्थिकवाढीचा दर व रोजगारवृद्धी कमी होईल. आताच आपल्याकडे आयातीला पूरक सहा महिने पुरेल एवढी गंगाजळी आहे, असे सांगितले जात आहे याचा अर्थ एकातून दुस-या आर्थिक संकटात येण्याच्या शक्यता बोलल्या जात आहेत.


रुपयाची घसरण थांबवण्यासाठी तातडीची उपाययोजना आवश्यक
याचा अर्थ स्वच्छ व स्पष्ट आहे की आपल्याला रुपयाची घसरण थांबवून रुपयाची किंमत प्रतिडॉलरला 55-56 रुपयांपर्यंत खाली आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे भाग आहे. 1) यासाठी रिझर्व्ह बॅँकेने उपाययोजना करणे म्हणजे, मुख्यत: जवळचे डॉलर्स बाजारात आणणार. पण या उपायाची मर्यादा, मर्यादित गंगाजळीने सीमित केली आहे. 2) सरकारने आयातीवर करवाढ करणे बंधने घालणे या सरकारी धोरणाचा उपयोग करणे, गरजेचे आहे. ते हे करतील अशी आशा आहे. 3) तिसरा उपाय म्हणजे, आंतरराष्‍ट्रीय बाजारात दीर्घमुदतीसाठी आंतरराष्‍ट्रीय अर्थसंस्थेकडून कर्जउभारणी व त्या कर्जाचा उत्पादक कामासाठी उपयोग करणे या कर्जाचा लगेच ताबडतोब उपयोग होणार नाही. हे असले तरी दीर्घकालीन उपाय राबविण्यात जास्त गरज आहे.


आयात कमी करून निर्यात वाढवावी,
विदेशी गुंतवणुकीवर विसंबणे नको

आगामी तीन वर्षात आयात कमी करून निर्यात वाढवावी, थेट विदेशी गुंतवणूक असो वा अप्रत्यक्ष तिच्यावर फार विसंबणे त्रासदायक ठरत आहे. आपली परिस्थिती त्रासाची असली की त्याच वेळी ही परदेशी गुंतवणूक बाहेर जाते याचे प्रत्यंतर आले आहे. जून 2013 मध्ये 5 लाख बिलियन डॉलर्स गुंतवणूक बाहेर गेली व त्यातील साडेतीन लाख बिलियन तर मागील पंधरवड्यातच गेली. म्हणून, परदेशी भांडवल सहायक, पूरक आहे. खरी गुंतवणूक आपली आपणच बचतीतून उभारली पाहिजे. त्यातील आयातीचे विश्लेषण केले तर इंधनतेल, कोळसा यांच्या आयातीचे बिल मोठे आहे. ते कमी कसे करायचे? काटकसर हा उपाय आहेत शिवाय पर्यायी अपारंपरिक स्रोतांचा वापर वाढविणे भाग आहे.


सोन्याची आयात थांबवावी,
अबकारी शुल्क वाढवावे

सोन्याची आयातही बंद करावी, आहे ते देशातले सोने पुरेसे आहे. याशिवाय कॉस्मेटिक्स आणि चैनीच्या वस्तू ज्या मोठ्या प्रमाणावर आयात होतात, त्यावर अबकारी शुल्क वाढवावे. निर्यातीच्या बाबतीत धातू निर्यातीशिवाय अन्नधान्य, तयार माल, औषधे, आयटी क्षेत्रातील निर्यात कशी वाढेल यावर लक्ष केंद्रित करायला हवे. सर्वच राजकीय पक्षांनी या कठीण काळात एकदिलाने काम करणे गरजेचे आहे.


सरकारी अधिकारी नेत्यांवर 10 टक्के
इंधन बचतीचा नैतिक दबाव आणावा

सर्वसामान्य माणूस म्हणून आपणही याला हातभार लावू शकतो, त्याकरिता सोने आणि सोन्याचे दागिने खरेदी बंद करावी, त्याऐवजी ती रक्कम अधिक सुरक्षित, लाभदायी पर्यायात गुंतवावी दुसरे आपण पेट्रोल-डिझेलचा वापर वैयक्तिक पातळीवर किमान दहा टक्के कमी करावा. नेते, सरकार, अधिकारी यांनी 10 टक्के इंधन बचत करण्यास त्यांच्यावर दबाव आणावा. तिसरे चैनीच्या वस्तूंची, त्यातही आयात केलेल्या चैनीच्या वस्तूंची खरेदी थांबवावी. चौथे बचत वाढवावी व ती उत्पादक क्षेत्रातील गुंतवणुकीकडे जाण्यासाठी बॅँकांमध्ये गुंतवावी, अन्नधान्याचाही गरजेपुरताच साठा ठेवावा, परदेशी वस्तू खरेदी टाळून त्यासाठी देशीपर्याय थोडासा महाग असला तरी वापरावा. एवढे आपण केले तरी ही देशसेवा होईल व ती सर्वांना उपयोगी पडेल.