आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Levy On Gold, Silver, Non essential Imports To Go Up

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोन्यावरील आयात शुल्क वाढणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जुलैमधील घटलेल्या आयातीने केंद्र सरकारला थोडाफार दिलासा मिळाला; परंतु रुपयाचे अवमूल्यन, चालू खात्यातील तुटीला लगाम घालतानाच आयात आणखी नियंत्रणात आणण्याचे सरकारने आणखी पुढचे पाऊल टाकले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता सोने, चांदी, तेल आणि बिगर जीवनावश्यक वस्तूंवरील आयात शुल्कात आणखी वाढ करण्याचे संकेत वित्तमंत्र्यांनी लोकसभेत दिले आहेत.

पायाभूत क्षेत्राला वित्तपुरवठा करण्यासाठी व सार्वभौम रोख्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील वित्त संस्थांना परवानगी देणे, विदेशी कर्जासाठी असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आणखी शिथिलता आणण्यासाठी तसेच देशात येणार्‍या भांडवलाचा ओघ आणखी वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेण्यात येणार असल्याचे वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी लोकसभेत माहिती देताना सांगितले.

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांना विदेशी कर्जाच्या माध्यमातून अतिरिक्त निधी उभारण्यास परवानगी देणे, अनिवासी भारतीयांच्या ठेव योजनेत आणखी शिथिलता आणणे यासह अनेक उपाययोजना सरकार हाती घेणार असल्याचे ते म्हणाले.