आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'G-Flex\'चा REVIEW: नो स्‍क्रॅच, 55 इंची टीव्हीसारखी पिक्‍चर क्‍वॉलिटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय बाजारात LG चा पहिला कर्व्हस्क्रीन असलेला स्मार्टफोन 'LG G Flex' नुकताच लॉन्च झाला आहे. लॉन्चिंगसोबत हा फोन भारतातील महागड्या स्मार्टफोनमध्ये सहभागी झाला आहे. या फोनबाबत अनेक गॅजेट एक्सपर्ट्सने वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. फोन अद्ययावत फीचर्सनी परिपूर्ण असून त्याचा स्टायलिश लूक लुभावणारा असल्याची पावतीही त्यांनी दिली आहे. मात्र, G Flex ची किंमत जरा जास्त असल्याने त्याला प्रतिसाद कमी मिळेल, अशी भीतीही वर्तवण्यात आली आहे.

काय म्हणतात टेक साइट्स-
* CNET-
'Cnet' दिलेल्या रिव्यूमध्ये या फोनच्या स्टायलिश लूकची खूप प्रशंसा केली आहे. फोनच्या डिझाइनसाठी कंपनीने खूप परिश्रम घेतले आहेत. अद्ययावत फीचर्स देऊन कंपनीने या फोनला सेफ स्मार्टफोन बनवल आहे. 'cnet'ने या फोनला 5 पैकी 3.5 स्टार दिल आहे.

* ENGADGET-
टेक साइट 'engadget'ने 'LG G Flex'ला उत्कृष्ठ स्मार्टफोन म्हटले आहे. 'engadget'नुसार, या फोनमध्ये शानदार फीचर्स आहेत, परंतु खरेदी करण्याची घाई करू नये, असाही सल्ला दिला आहे.

* TECHRADAR-
'LG G Flex'बाबत 'Techradar'ने आपल्या रिव्यूमध्ये फोनची बॅटरी अधिक पॉवरफूल असल्याचे म्हटले आहे. या फोनचा बॅटरी बॅकअप उत्तम आहे. याशिवाय फोनची कर्व्ह डिझाइन लाजवाब आहे.

तंत्रज्ञानाच्या युगातील या तीन दिग्गज वेबसाइट्सनी 'LG G Flex' ला अद्ययावत फीचर्स असलेला फोन म्हणून सांगितले आहे. याचे कर्व्ह डिझाइन आकर्षक आहे. मात्र, भारतीय बाजारात या फोनची किंमत 70 हजार रुपये आहे. हा महागडा फोन आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, 'LG G Flex' चे फीचर्स...