आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lg G3 With QHD Screen Launched, Lg G3 Features, Specifications

Laser ऑटोफोकस कॅमेर्‍याने अद्ययावत असलेला LG G3 झाला लॉन्च

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'सिंपल इज द न्यू स्मार्ट' या टॅगलाइनने LG कंपनीने आपला बहुचर्चित लेटेस्ट फ्लॅगशिप फोन G3 अखेर लॉन्च केला. न्यूयॉर्क आणि लंडनमध्ये एकाच वेळी झालेल्या वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये LG G3 सादर करण्‍यात आला. LG G3 मध्ये फुल एचडी स्क्रीन पेक्षाही शानदार रेझोल्यूशन देण्यात आले आहे. याशिवाय ऑटोफोकस कॅमेर्‍याने हा स्मार्टफोन अद्ययावत आहे. अवघ्या 0.276 सेकंदात कोणत्याही ऑब्जेक्टला फोकस करतो. यासोबत फ्रंट कॅमेरासह ऑटोमॅटिक सेल्फी फीचर्सही देण्यात आले आहे.
किल स्विच-
किल स्विच फीचर्समुळे फोनला अधिक प्रोटेक्शन मिळते. यामुळे कोणताही अनोळखी व्यक्ती तुमचा फोन उघडू शकत नाही. किल स्विच हे फीचर अॅक्टिव्हेट होताच फोन आपोआप बंद (शटडाउन) होत. एखाद्याने फोनचा लॉक जबरदस्तीने उघडण्‍याचा प्रयत्न केला तर त्याचा काही उपयोग होत नाही. त्यानंतर मात्र हा फोन केवळ एक खेळण्याची वस्तू होऊन जाते.
गेल्या वर्षी लॉन्च झालेला LG चा G2 स्मार्टफोनला गॅझेट एक्सपर्ट्सकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. सन 2013 च्या टॉप 10 स्मार्टफोनमध्ये LG G3 ने स्थान मिळवले होते. LG G3 बाबतही अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. G3 च्या किंमतीबाबत कंपनीने खुलासा केला नसला तरी सॅमसंग गॅलेक्सी S5 आणि सोनी एक्सपीरिया Z2 ला हा लेटेस्ट फोन टक्कर देण्याची शक्यता नाकारता येत नाही. 45,000-55,000 रूपये दरम्यान हा फोन भारतात उपलब्ध होऊ शकतो.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, LG G3 चा शानदार लूक