आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आला एलजीचा सुपर टॅब्लेट ‘ऑप्टिमस पॅड’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - टॅब्लेट कॉम्प्युटरची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणारी अग्रगण्य कंपनी एलजीनेही या बाजारात उडी घेतली आहे. ‘एलटीई’ क्षमता असलेला पहिला सुपर टॅब्लेट ‘ऑप्टिमस पॅड’ एलजीने सादर केला आहे. टचस्क्रीन डिस्प्ले असलेल्या या टॅबचा डिस्प्ले एलटीई तंत्रज्ञान ट्रू एचडीआयपीएस क्षमतायुक्त आहे. अत्याधुनिक फीचर्स आणि उच्च क्षमता असल्यामुळे एलजीचा हा ऑप्टिमस पॅड सॅमसंग गॅलक्सी टॅब आणि आयपॅडला जोरदार टक्कर देईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

हाय डेफिनेशन स्क्रीन
अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम असणाºया या टॅबमध्ये 8.9 इंचांची आयपीएस ट्रू एचडी स्क्रीन आहे. तसेच यात 1.5 गिगाहर्ट्झचा प्रोसेसर आहे.

एकमेवद्वितीय थ्रीडी फीचर्स
एलजी ऑप्टिमसमध्ये इतर कोणत्याही टॅब्लेटमध्ये नसलेले थ्रीडी फीचर्स आहेत.
याचा बॅटरी बॅक अप 6 ते 16 तासांपर्यंतचा आहे.

तगडी टक्कर मिळणार
फक्त 479 ग्रॅमचा हा टॅब सध्या कोरियात दाखल झाला आहे. या टॅब्लेटला मोटोरोलाचा झूम, सॅमसंग गॅलक्सी टॅबकडून आव्हान आहे.

एसडी मेमरी कार्ड
ऑप्टिमस पॅडचे वैशिष्ट्य म्हणजे तो एसडी मेमरी कार्डला सपोर्ट करणारा जगातील पहिला टॅब्लेट कॉम्प्युटर आहे. यात 32 जीबीपर्यंत डाटा साठवता येऊ शकतो.

ड्युअल कॅमेरे
हाय डेफिनेशन स्क्रीन असणाºया ऑप्टिमस पॅडमध्ये 8 मेगापिक्सलचा शक्तिशाली कॅमेरा आहे. यामुळे हायडेफिनेशन फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करता येतील.

अँड्रॉइड ओएस
आज बहुतांश टॅब्लेटमध्ये गुगलची अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टिम वापरली जाते. एलजीच्या या शक्तिशाली टॅब्लेटमध्येही अँड्रॉइडचे 3.2 हनिकोम्ब व्हर्जन वापरण्यात आले आहे.