आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दमदार फिचर्सने सज्‍ज \'एलजी\'चा \'ऑप्‍टीमस जी प्रो\' सादर; सॅमसंग, ब्‍लॅकबेरीला टक्कर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- स्मार्टफोनच्‍या बाजारपेठेत मुसंडी मारण्‍यासाठी 'एलजी'ने कंबर कसली आहे. लोकप्रिय झालेल्‍या 'ऑप्‍टीमस' मालिकेत जबरदस्‍त फिचर्सने सज्‍ज असलेला नवा स्‍मार्टफोन सादर केला आहे. 'ऑप्टिमस जी प्रो' असे या स्‍मार्टफोनचे नाव आहे. नवी दिल्‍लीत एका शाही कार्यक्रमात हा फोन लॉंच करण्‍यात आला.

एलजीने 4 वर्षांपूर्वी ऑप्‍टीमस मालिकेतील पहिला स्‍मार्टफोन सादर केला होता. हा फॉन अ‍ॅण्‍ड्रॉईड ऑपरेटींग सिस्टिमवर चालणारा होता. त्‍यानंतर 'ऑप्‍टीमस पी 500 वन' हा स्‍मार्टफोन बाजारात आणला. त्‍यावेळी हा फोन तेव्‍हाच्‍या स्‍मार्टफोनच्‍या श्रेणीत सर्वोत्तम गणल्‍या गेला होता. हा फोन अतिशय लोकप्रिय झाला होता. त्‍यानंतर सॅमसंगने स्‍मार्टफोनच्‍या क्षेत्रात मुसंडी मारली. सर्वसामान्‍यांना परवडेल अशा किंमतीमध्‍ये 'गॅलेक्‍सी वाय' हा स्‍मार्टफोन सॅमसंगने आणला. हळूहळू सॅमसंगने गॅलेक्‍सी श्रेणीचा विस्‍तार केला आणि बाजारपेठेचा मोठा हिस्‍सा काबीज केला. कार्बन, मायक्रोमॅक्‍स, लाव्‍हा इत्‍यादी कंपन्‍यांनीही या स्‍पर्धेत उड्या घेतल्‍या. त्‍यामुळे एलजी स्‍मार्टफोनची विक्री मदावली होती. आता कंपनीने दमदार फिचर्स आणि स्‍पेसिफिकेशन्सचे हॅण्‍डसेट्स सादर केले आहेत.

'ऑप्‍टीमस जी प्रो' हा एक दमदार स्‍मार्टफोन आहे. सॅमसंग, ब्लॅकबेरी तसेच अ‍ॅपलच्‍या आयफोनला हा हॅण्‍डसेट स्‍पर्धा देऊ शकेल.

या फोनची वैशिष्‍ट्ये जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईडवर...