आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलआयसीचे जीवन सुगम रोखे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतीय आयुर्विमा महामंडळाने ‘जीवन सुगम’ या नावाने करमुक्त रोखे विक्रीला आणले आहेत. या रोख्यांची मुदत संपल्यानंतर मिळणार्‍या प्राप्तीवर कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागत नाही त्याचप्रमाणे प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत करसवलत मिळणार असल्याने गुंतवणूकदारांसाठी हा चांगला पर्याय आहे.

परताव्याशिवाय यामध्ये विमाछत्रदेखील उपलब्ध असून ते गुंतवणुकीच्या दहापट आहे. या रोख्यांमध्ये किती प्रमाणात गुंतवणूक करावी यावर मर्यादा नाही. त्याचप्रमाणे वैद्यकीय तपासणीही लागू नाही. जोखमीसाठी गुंतवणूकदाराची वयोमर्यादा 45 वर्षे निश्चित केली आहे. मात्र, कुटुंबातील ज्याचे वय आठ वर्षे पूर्ण झाले आहे, अशा बालकाच्या नावावर या योजनेत गुंतवणूक करता येऊ शकते. ‘जीवन सुगम’च्या इतर लाभांमध्ये दीड लाखापेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास वाढत्या वेगाने प्रोत्साहने मिळतील. याशिवाय एलआयसी पॉलिसीवरील कर्जाप्रमाणे रोकड सुलभता मिळते आणि ती पहिल्या दिवसापासून उपलब्ध आहे. ‘जीवन सुगम’ योजना 31 मार्चला बंद होणार आहे.