आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुर्विम्याशी निगडित काही गैरसमज

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुर्विमा उद्योगाबाबत लोकांमध्ये अनेक समज-गैरसमज आहेत. या कारणामुळे अनेक जण एकतर विमा उतरवत नाहीत किंवा विमा काढून घेतात. आयुर्विम्याशी निगडित काही गैरसमजाविषयी..
1. मी एकटाच आहे. माझ्यावर कोणीही विसंबून नाही. त्यामुळे विम्याची गरज नाही : वास्तविक एकटे असले तरी विमा असणे आवश्यक आहे. पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर मिळालेल्या रकमेचा वापर निवृत्तीनंतरच्या दिवसांत उपयोगी पडतो. त्याबरोबरच कर बचतीचा लाभही मिळतो. जर विमा न काढताच मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या आर्थिक देण्याचा तसेच कर्जाचा भार त्याच्या माता-पिता किंवा भाऊ-बहिणींवर पडतो.
2.माझ्याकडे 3-4 पॉलिसीज आहेत, आता विम्याची गरज नाही : पॉलिसीच्या संख्येवर विम्याची गरज अवलंबून नसते. एखाद्याला 50 लाख रुपयाचे विमा छत्र आवश्यक आहे आणि त्याच्याकडे दोन लाखांच्या चार ते पाच पॉलिसीज आहेत. याचाच अर्थ विमा छत्राच्या 80 टक्के विमा कमी आहे.
3. केवळ कमावणार्‍यांसाठी आयुíवमा आवश्यक आहे : हा समज खरा नाही. एवढेच नव्हे तर गृहिणीचाही आयुर्विमा असणे गरजेचे आहे. ती गृहिणी जग सोडून गेली तर ती जे काम करत होती ते एखाद्या व्यावसायिक व्यक्तीकडून केल्यास त्याचा खर्च अंदाजापेक्षा जास्त होऊ शकतो. यात मुलांचे संगोपन, त्यांची शिकवणी, साफसफाई याचाही खर्च समाविष्ट आहे.
4. आयुर्विमा करणे महाग आहे : अनेक जण आयुर्विम्यासाठी तीनपट जास्त खर्च लागतो असे मानतात हे अनेक जणांनी केलेल्या अभ्यासाअंती दिसून आले आहे. वास्तविक 30 वर्षांच्या सदृढ तरुणाच्या शुद्ध टर्म प्लॅनच्या मासिक प्रीमियमचा खर्च कुटुंबाच्या एका जेवणाइतका असतो.
5. कंपनी, संस्थेने दिलेले विमा संरक्षण पुरेसे आहे : काही कंपन्या, कार्यालये तसेच संस्था आपल्या कर्मचार्‍यांचा विमा उतरवतात. या विमा पॉलिसीचे फीचर्स र्मयादित असतात. कंपनी सोडल्यास विमा संरक्षण संपते.
6. टर्म प्लॅनपेक्षा इनव्हेस्टमेंट- कम- इन्शुरन्स प्लॅन चांगला असतो : सर्वसाधारणपणे टर्म प्लॅन म्यॅच्युअर झाल्यानंतर ती व्यक्ती जिवंत असेल तर काहीच लाभ मिळत नाही. त्यामुळे अनेक जण शुद्ध विम्यापासून दूर राहतात. त्यामुळे बहुतेक गुंतवणूकदार इन्व्हेस्टमेंट-कम-इन्शुरन्स प्लॅन घेणे पसंत करतात. मात्र, वास्तविकता वेगळी असू शकते. यासाठी शुद्ध टर्म विम्याचा पर्याय निवडावा.
आयुर्विम्याला आपल्या बजेटच्या बाहेर ठेवू नका किंवा आपल्याकडे एवढी संपत्ती असावी की, आपल्या पश्चात कुटुंबाच्या सर्व गरजांची पूर्तता होईल. आपल्या विम्याविषयक गरजांसाठी आपल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्यावा व त्यांनी सुचवल्यानुसार पुरेसे आयुर्विमा संरक्षण घेऊन कुटुंबाचे भविष्य सुरक्षित केले पाहिजे.
(लेखक प्रमाणित वित्तीय नियोजक आणि द फायनान्शिअल प्लॅनर्स गिल्ड इंडियाचे सदस्य आहेत.)