आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गतकाळाबद्दल समाधान वाटणे म्हणजेच नव्याने ते जीवन जगणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मैत्री ही एक सुंदर जबाबदारी आहे. ती जीवनात मिळालेली संधी समजू नका.
जी गोष्ट होऊन गेली आहे. ती आजच्यासाठी एक सुंदर आठवण आहे, परंतु आजच्यासाठी उद्याचा काळ हे एक स्वप्न आहे.
आनंद िकंवा दु:खाचा अनुभव घेण्यापूर्वीच आपण त्याची िनवड केलेली असते.
प्रेमाशिवाय जीवन जगणे म्हणजेच फळाविना नुसताच वाढलेला वृक्ष.
जीवन तुम्हाला दोन बक्षीसे देते, सौंदर्य आिण सत्य. सुंदर मनाजवळ सौंदर्य असते. पण जो काम करतो, तोच सत्य बोलतो.
माणसाच्या मनात िवश्वासाची एक वेगळी जागा आहे. केवळ िवचार करीत रािहल्याने आपण विश्वास प्राप्त करू शकत नाही.
प्रेम आिण संशय यांच्यामध्ये मैत्री कधीही शक्य होत नाही.
जे लोक फार बोलतात, त्यांच्यापासून शांत रहायला िशका. ज्या लोकांमध्ये संयम आहे, त्यांच्याकडून संयम शिका, परंतु मी या िशक्षकांचे कधीच आभार मानले नाहीत.
तुमचे रहस्य एका व्यक्तीला सांिगतले असेल तर तेच रहस्य दुसऱ्या माणसाला सांगण्याचा मोह तुम्ही टाळू शकत नाही.
प्रेमाने नाही तर अर्धवट मनाने व बुध्दीने तुम्ही जर काम करत असाल तर तुम्ही काम करणे सोडून देणे उत्तम होय.
कोणत्याही व्यक्तीचे मन आिण बुध्दी समजून घेण्यासाठी हे पाहू नका की त्याने काय िमळविले आहे. याउलट त्याला काय मिळवायची इच्छा आहे, यावर तुम्ही तुमचे लक्ष केंद्रीत करा.
तुमचे मन एखाद्या ज्वालामुखीप्रमाणे आहे. त्याच्यामध्ये राग भरला असेल तर तुमच्या हातात फूल देऊन तरी काय उपयोग आहे.
जीवनात स्वातंत्र्य नसेल तर त्याला आत्मािशवाय शरीराची उपमा देता येते.
दुसऱ्याच्या अिधकारांचे रक्षण करणे हाच मनुष्याच्या जीवनाचा सुखद शेवट आहे.
तुम्हाला जर एखाद्याने दु:ख िदले तर तुम्ही ते बेधडकपणे िवसरून जा. परंतु, तुम्ही जर कोणाला दु:ख देत असाल तर तुम्ही ते आयुष्यभर िवसरू शकत नाही.
मी सत्य शोधले आहे, याऐवजी याउलट मी एका सत्याचा शोध लावला आहे, असे म्हणा.
जेव्हा मी आम्ही एक दुसऱ्याची मदत करण्यासाठी िकंवा त्याची समजूत काढण्यासाठी वाकत असतो तेंव्हा तुम्ही तुमच्या शत्रूंची संख्या कमी करत असता.
एखाद्याने काही मािगतले तर द्या, परंतु परस्पर कोणाला काही देणे ही गोष्ट सर्वश्रेष्ठ आहे.