आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हलक्या व्यावसायिक वाहनांना मंदीची झळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वाहन उद्योगात आलेल्या मंदीची झळ नजीकच्या काळात व्यावसायिक वाहनांनादेखील बसण्याची शक्यता आहे. विशेष करून हलक्या व्यावसायिक वाहनांच्या विक्री वृद्धीमध्ये चालू वर्षात घट होण्याचा अंदाज आहे. परंतु मध्यम कालावधीत मात्र पुन्हा या विक्रीला गती मिळण्याचे इक्राने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

चालू आर्थिक वर्षातल्या एप्रिल ते जून या तिमाही कालावधीत वार्षिक आधारावर हलक्या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीमध्ये 3.9 टक्क्यांनी घट झाली आहे. वास्तविक पाहता वाहन कंपन्यांना गेल्या अनेक वर्षांपासून हलक्या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीने तारले असल्याचे दिसून येते.

लहान व्यावसायिक वाहनांच्या विक्रीला फटका बसण्याचे सध्याची उद्योगातील मंदी हेच मुख्य कारण ठरले असल्याचे ‘इक्रा’ या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. परंतु मध्यम कालावधीत मात्र या वाहनांच्या विक्रीत संकलित वार्षिक आधारावर साधारणपणे 11 ते 13 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाजही या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

2009 - 10 आणि 2010- 11 या कालावधीत स्थानिक व्यावसायिक वाहनांच्या विक्रीने 30 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवली. परंतु नंतर मात्र ही वाढ आटली आहे.

2011 - 12 च्या दुसर्‍या सहामाहीपासून मंदावलेली औद्योगिक वाढ आणि जवळपास सर्वच क्षेत्रांतील गुंतवणुकीची घसरलेली मानसिकता याचा व्यावसायिक वाहनांच्या मागणीवर विपरीत परिणाम झाला आहे.

इक्राच्या अहवालानुसार 2011 - 12 या वर्षात देशातील व्यावसायिक वाहन उद्योगाच्या वाढीमध्ये त्याअगोदरच्या वर्षाच्या तुलनेत 18.2 टक्क्यांनी घसरण झाली असल्याचे अहवालात म्हटले आहे.