आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात बाजारात सावध वातावरण होते. किरकोळ वाढ होऊन बाजार बंद झाला. आठवड्याच्या सुरुवातीला दिसलेली वाढ आणि दरकपातीनंतरचे बाजारातील पडसाद काहीसे अपेक्षेनुसारच होते. मागील वेळी मी नमूद केल्याप्रमाणे पाव टक्का कपात बाजाराला अपेक्षितच होती, मात्र बाजाराची नजर जास्त कपातीवर होती.
रिझर्व्ह बँकेने तिमाही पतधोरणात रेपो दरात पाव टक्का कपात केली. त्याशिवाय सीआरआरमध्ये पाव टक्का कपात केली आहे. दशकातील नीचांकी पातळीवर असलेल्या विकास दरात वाढ व्हावी या हेतूने रिझर्व्ह बँकेने हे पाऊल टाकले आहे. वित्तीय तूट कमी करण्यासाठी सरकारकडून होणाºया उपायांवर पुढील व्याजदर कपात अवलंबून राहील या बँकेच्या इशाºयाने बाजाराची निराशा केली.
या आठवड्यात अनेक महत्त्वाची आकडेवारी जाहीर होणार आहे. या काळात बाजार एक ठरावीक कक्षेत राहण्याची शक्यता असून त्याच वेळी नफेखोरीकडे कल राहील. मात्र, ही नफेखोरी मर्यादित असेल. गुरुवारी जानेवारीतील डेरिव्हेटिव्ह सौदापूर्तीची मुदत संपते, त्यामुळे अस्थैर्य दिसून येईल. 31 जानेवारी रोजी वित्तीय तसेच व्यापारी तुटीची आकडेवारी जाहीर होणार आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ही आकडेवारी महत्त्वाची आहे. आतापर्यंत या आकडेवारीने बाजाराला निराशच केले आहे. गुरुवारीही तसेच चित्र राहिल्यास नफेखोरी दिसून येईल. एप्रिल ते नोव्हेंबर 2012 या काळात वित्तीय तोटा 4.13 लाख कोटी रुपये होता. हे प्रमाण या आर्थिक वर्षातील लक्ष्याच्या 80.4 टक्के आहे. एचएसबीसी मार्केट मॅन्युफॅक्चरिंग पीएनआयच्या आकडेवारीवर बाजाराची नजर राहील. डिसेंबरमध्ये हा निर्देशांक 54.7 होता, जो सकारात्मक आहे. यातील वाढ बाजाराच्या दृष्टीने सकारात्मक राहील.
जोपर्यंत निफ्टी 6005 या पातळीवर आहे, तोपर्यंत बाजारातील सकारात्मकतेला धोका नाही. घसरणीचा दबाव राहीलच. जर निफ्टीने ही पातळी तोडली व त्याखाली बंद झाला तर हा दबाव आणखी वाढेल. तरीही बाजार मर्यादित कक्षेतच राहण्याची शक्यता आहे. निफ्टीला पुढील आधार 5977 वर मिळेल. हा महत्त्वाचा आधार असला तरी मोठा नाही. महत्त्वाचा यासाठी कारण त्याखाली गेल्यानंतरही निफ्टी लवकरच 5935 पर्यंत पोहोचू शाकतो. मोठा नाही, कारण या पातळीवर मोठ्या व्हॉल्यूमसह विक्री झाल्यास ही पातळी फारशी टिकाव धरणार नाही. मात्र, 5935 वर निफ्टीचा कल कसा राहील हे पाहणे तेवढेच महत्त्वाचे राहील. या पातळीवर निफ्टीला तगड्या आधाराची गरज आहे.
वरच्या दिशेने निफ्टीला पहिला अर्थपूर्ण अडथळा 6112 या स्तरावर मिळेल. या पातळीवर गेल्यास बाजारात सकारात्मक वातावरण राहण्याची अपेक्षा करता येईल. निफ्टी त्यापुढे 6187 अंकांपर्यंत झेप घेऊ शकतो.
शेअर्सच्या बाबतीत या आठवड्यात टायटन इंडस्ट्रीज लिमिटेड, स्टेट बँक ऑ फ इंडिया आणि एचडीएफसी लिमिटेड चार्टवर चांगले वाटताहेत. टायटन इंडस्ट्रीज लिमिटेडचा मागील बंद भाव 296.80 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 277 आणि स्टॉप लॉस 261 रुपये आहे. स्टेट बँक ऑ फ इंडियाचा मागील बंद भाव 2457.30 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 2512 आणि स्टॉप लॉस 2394 रुपये आहे, तर एचडीएफसी लिमिटेडचा मागील बंद भाव 803 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 816 आणि स्टॉप लॉस 789 रुपये आहे.
लेखक तांत्रिक विश्लेषक आणि
moneyvistas.comचे सीईओ आहेत.
Vipul.verma@dainikbhaskargroup.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.