आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिनियाला नवा साज, कारला चढला आकर्षक लूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आलिशान आणि आरामदायी प्रवासाचा एक नवा आनंद देण्यासाठी फियाट ग्रुप ऑटोमोबाइल्स इंडिया प्रा.लि. या कंपनीने अगोदरची ‘लिनिया’ मोटार आणखी आकर्षक रूपात पुन्हा बाजारात दाखल केली आहे. देखणे बाह्यस्वरूप तसेच अंतर्गत सुविधांमध्ये सुधारणा हे या नव्या मोटारीचे खास वैशिष्ट्य ठरले आहे.
‘सी प्लस’ गटात उपलब्ध असलेल्या अन्य मोटारींमधील सुविधांच्या तुलनेत नव्या लिनियामध्ये अधिक जास्त सुविधा आणि सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. चालवण्याची कामगिरी, सुरक्षितता, आराम, राइड, हँडलिंग आणि अंतर्भागातील मनोरंजनाच्या क्षेत्रात नवे मापदंड निर्माण केले आहेत. थोडक्यात, उच्च र्शेणीतील मोटारींमध्ये मिळणार्‍या सुविधा या नव्या लिनियामध्ये बघायला मिळणार आहेत. नव्या क्रूझ कंट्रोल सुविधेमुळे अतिशय वेग असतानाही सुरक्षित आणि आरामदायी ड्रायव्हिंंग करणे शक्य होते. याशिवाय ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित व्हावे यासाठी ईबीडीसह ब्रेक लॉकिंगविरोधी यंत्रणा आणि चटकन दखल घेणारी ड्युएल स्टेज एअरबॅग्ज या सुविधाही पुरवण्यात आल्या आहेत. सी प्लस गटातील ही सर्वात लांब असून तिची उंचीही सर्वाधिक आहे.