आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायक्रोमॅक्‍सचे जबरदस्‍त फिचर्स असलेले स्‍मार्टफोन्‍स, स्‍वस्‍तात मस्‍त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्‍मार्टफोनची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. एक दर्जेदार आणि उत्कृष्‍ठ फिचर्स असलेला स्‍मार्टफोन घेण्‍याची प्रत्‍येक मोबाईलधारकाला इच्‍छा असते. त्‍यातही कमी किंमतीमध्‍ये स्‍मार्टफोन मिळाला तर? याबाबतीत मायक्रोमॅक्‍ससारख्‍या ब्रँडने अनेक पर्याय दिले आहेत. गेल्‍या काही महिन्‍यांमध्‍ये मायक्रोमॅक्‍सने दमदार स्‍मार्टफोन अतिशय कमी किंमतीत बाजारात आणले आहेत. जबरदस्‍त फिचर्स, स्‍टाईल आणि कमी किंमत असा तिहेरी फायदा ग्राहकांना होतो.

मायक्रोमॅक्‍सने अतिशय स्‍वस्‍त फोन बाजारात आणून नोकियासारख्‍या कंपनीला कडवी टक्‍कर दिली होती. स्‍वस्‍त फोनच्‍या बाजारपेठेत यामुळे प्राईसवॉर सुरु झाले. त्‍यानंतर मायक्रोमॅक्‍सने स्‍मार्टफोनच्‍या श्रेणीत पाऊल टाकले. अ‍ॅंड्रॉईड ऑपरेटींग सिस्ट‍िमचा वापर करुन 2011 मध्‍ये पहिला स्‍मार्टफोन मायक्रोमॅक्‍सने सादर केला. आता मायक्रोमॅक्‍सची भली मोठी स्‍मार्टफोनची रेंज उपलब्‍ध आहे. त्‍यात अलिकडेच सादर केलेली कॅनव्‍हास श्रेणी अतिशय लोकप्रिय झाली. आता कंपनी कॅनव्‍हास-4 मॉडेल सादर करणार आहे.

मायक्रोमॅक्‍सच्‍या स्‍मार्टफोन श्रेणीची एक झलक आपण पाहू या ज्‍यात तुम्‍हाला मिळेल स्‍टाईल आणि दमदार फिचर्स तेदेखील कमी किंमतीत...

पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या मायक्रोमॅक्‍सचे काही सर्वोत्तम स्‍मार्टफोन्‍स...