आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सणासुदीत कर्जाची स्वस्ताई!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आर्थिकदृष्ट्या बुधवार सर्वसामान्यांसह सरकारलाही दिलासा देणारा ठरला. सणासुदीनिमित्त एसबीआयसह तीन बँकांनी कार, दुचाकी, टीव्ही, फ्रिज आदी वस्तूंवरील कर्जाचा व्याजदर घटवला.
सप्टेंबरमध्ये निर्यातीत 11.35 टक्क्यांची वाढ झाली आहे, तर आयात 18.1 टक्क्यांनी घटली आहे. यामुळे मार्च 2011 नंतर पहिल्यांदाच देशाचा व्यापार तोटा 6.7 अब्ज डॉलर्स या 30 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आल्यामुळे सरकारलाही दिलासा मिळाला आहे.


पीएफ व्याजदर वाढणार
कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेने पीएफवर 8.50 टक्क्यांपेक्षा अधिक व्याज देण्याचे संकेत दिले आहेत. सध्या 8.25 टक्के व्याजदर आहे.


एसबीआय
०कार लोनचा व्याजदर 0.20% घटवून 10.55%
० किमान प्रक्रिया शुल्क 500 रुपयांवर.
० विशेष योजनेअंतर्गत पगार खातेधारकांसाठी दुचाकी, टीव्ही, फ्रिज आदी ग्राहकोपयोगी वस्तूंवर 12.05% व्याजदर.


इंडियन ओव्हरसीज बँक
० ग्राहकोपयोगी वस्तूंवरील कर्जाच्या व्याजदरात 2 टक्क्यांची मोठी कपात ० आधीच्या 15.25 टक्क्यांऐवजी आता 13.25 टक्के व्याज.


देना बँक
० 1 कोटी गृहकर्जापर्यंत बेसरेट पाव टक्क्याने स्वस्त करत 10.25 टक्के ० कॉम्बो लोन योजनेअंतर्गत गृहकर्जासह कारवरील एक कोटीच्या कर्जावर 10.25 टक्के व्याजदर.