आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Loan Fraudulant Photo, Details Come In Newspaper, Banks Use New Strics

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्ज बुडवणा-यांचे छायाचित्र, तपशील येणार वर्तमानपत्रात; वसूलीसाठी बँकांची नवी युक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एखादे कर्ज घेऊन त्याची परतफेड नाही केली तर काय होईल? फक्त नोटीस येईल इतकेच ना ? असा विचार जर कर्जदार करीत असाल तर सावधान! कर्ज बुडवणा-यांचे नाक दाबून थकीत रक्कम वसूल करण्यासाठी बँकांनी आता कंबर कसली आहे. कर्ज बुडवल्यास संबंधित व्यक्तीच्या छायाचित्रासह त्याचा अन्य तपशील वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाल्यानंतर मात्र शरमेने मान खाली जाण्याची वेळ आता येऊ शकते. कदाचित आपल्याच बॅँकेच्या शाखेतही आपले छायाचित्र नोटीस बोर्डवर लावलेले दिसू शकते.


विशेष म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनीदेखील अशा प्रकारच्या उपाययोजना करण्यामध्ये पुढाकार घेतला आहे. त्यातूनही स्टेट बॅँक, युको बँक, अलाहाबाद बॅँक, इंडियन बॅँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक या बड्या बॅँकांनी कर्ज थकबाकीदारांची छायाचित्रे तसेच अन्य तपशील सार्वजनिक प्रसिद्ध करण्यात आगोदरच सुरुवात केली आहे.
थकबाकीदारांना खासगी बँकांकडून आतापर्यंत सार्वजनिक नोटीस देण्यात येत असली तरी त्याच संबंधितांचे किंवा जामीनदारांचे छायाचित्र त्यात नसायचे; परंतु आता मात्र अशा प्रकारच्या ‘नेम आणि शेम’ या अभिनव उपक्रमाचा विचार सक्रियपणे करीत असल्याचे एका वरिष्ठ बँक अधिका-याने सांगितले. अलाहाबाद बँकेकडे कर्जासाठी दोन मालमत्ता तारण ठेवून त्यावर कर्ज घेण्यात आले होते. कर्जदार ही कंपनी होती; परंतु ही कर्जाची थकबाकी भरण्यात ती अपयशी ठरली.

आता कर्जाची रक्कम 365 कोटी रुपयांवर गेली आहे. या दोन मालमत्तांची विक्री करण्यासाठी सार्वजनिक नोटिसीचा एक भाग म्हणून बॅँकेने या कर्जाच्या दोन जामीनदारांचे छायाचित्र, कंपनीचे नाव अलीकडेच वृत्तपत्रांत प्रसिद्ध केले आहे. स्टेट बॅँकेनेदेखील यंदाच्या मार्चपासून करबुडव्या व्यक्तींची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यास प्रारंभ केला असून
युको बॅँकेने कर्ज परतफेड न केल्याबद्दल एका ख्यातनाम उद्योगपतीचे नाव, छायाचित्र आणि अन्य तपशील प्रसिद्ध केला आहे. मूळ कर्जदाराच्या तपशिलासह नोटीस बजावल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत थकबाकीची परतफेड न झाल्यास छायाचित्र, नाव आणि जामीनदाराचा पत्ता प्रसिद्ध करण्यात येतो, असे बॅँकांनी सांगितले. काही बॅँकांनी स्थानिक पातळीवरील शाखांमध्येदेखील बुडव्या कर्जदारांचे छायाचित्र व तपशील मदेखील घेतला आहे.


एकूण थकबाकी 5563 कोटी रुपये : सिबिल
क्रेडिट इन्फर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेडने (सिबिल) देखील 25 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या कर्जबुडव्यांची यादी तयार केली आहे. एक कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या कर्ज थकबाकीदारांविरोधात खटला दाखल केलेल्या 516 प्रकरणांची यादी देखील सिबिलने तयार केली आहे. या कर्ज थकबाकीची एकूण रक्कम 5563 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.


थकबाकीदारांत महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर
31 डिसेंबर 2012 अखेर एकूण 123 संभाव्य कर्जबुडव्यांच्या विरोधात खटला दाखल केला असून या कर्जाची रक्कम जवळपास 2,993.22 कोटी रुपये आहे. यापैकी सर्वाधिक थकबाकीदारांचे प्रमाण तामिळनाडूमध्ये (25) असून त्यापाठोपाठ महाराष्‍ट्र (23), केरळ (16), उत्तर प्रदेश (14) आणि गुजरात (11) या राज्यांचा क्रमांक लागतो.