आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोन्स : घर जुने असल्यास वाढते डाऊन पेमेंट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गृह कर्जाच्या बाबतीत जमीन किंवा घराची किंमत आणि तारण कर्जाची रक्कम यातील फरकाला डाऊन पेमेंट म्हटले जाते. कर्ज घेतेवेळीच कर्जधारकाला ही रक्कम द्यावी लागते. कर्जाची रक्कम मंजूर करण्यापूर्वी बँक इमारतीचे वय लक्षात घेते. जर कर्जधारक जुन्या इमारतीतील फ्लॅटमध्ये राहत असेल तर त्या दृष्टीने त्याची डाऊन पेमेंटची रक्कम वाढू शकते. अशा स्थितीत खरेदीदाराला खिशातून अधिक रक्कम द्यावी लागते.

कर्जासाठी पात्रता ठरवताना बँका किंवा वित्त पुरवठा कंपन्या सर्वप्रथम घर किंवा जमिनीचा विचार करतात. कर्जदार त्याच्या उत्पन्नानुसार जास्त रकमेच्या कर्जासाठी पात्र असला तरी होम लोनसाठी बँका डाऊन पेमेंटची अट ठेवतातच. तसेच जे कर्ज मंजूर झाले आहे त्याचे मूल्य घराच्या बाजारभावापेक्षा कमी असेल याकडेही बँका लक्ष ठेवतात. जर कर्जदार कर्ज फेडू शकला नाही तर ते घर विकून थकीत रकमेची वसुली व्हावी, असा हेतू त्यामागे असतो. तसेच डाऊन पेमेंटच्या रूपाने कर्जदाराचा घरातील काही हिस्सा निश्चित होतो.

जास्त डाऊन पेमेंट उत्तम : यामुळे कर्जाच्या रकमेचा भार हलका होतो. शक्य असेल तर डाऊन पेमेंट स्वत:च्या रकमेतून द्यायला हवे. यासाठी बचत किंवा दुसरी संपत्ती विकून पैसे जमवायला हवेत. यासाठी पर्सनल लोनचा पर्याय महाग पडू शकतो. कारण पर्सनल लोनचे व्याज जास्त असते. जर पैशांची सोय होत नसेल तर काही काळ प्रतीक्षा करणे केव्हाही चांगले. जेव्हा डाऊन पेमेंटच्या रकमेची सोय होईल तेव्हा कर्ज घेणे अधिक उत्तम.

तसेच घर खरेदीसाठी लागणारे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) आणि नोंदणी शुल्क (रजिस्ट्रेशन फी) यासाठीचे पैसे खरेदीदाराला द्यावे लागतात, हे लक्षात ठेवावे. हा खर्च कर्जात समाविष्ट नसतो.

डाऊन पेमेंट संकल्पना कायम का आहे : 1. ही रक्कम भरण्याची क्षमता कर्जदाराची पत दर्शवते. 2. डाऊन पेमेंट म्हणजे कर्जदाराची नव्या वास्तूतील वास्तविक गुंतवणूक असते. यातून कर्जाचा हप्ता वेळेवर मिळण्याची हमी बँकेला मिळते. 3. बँकेसाठी हे विम्याप्रमाणे असते. कर्जदाराने मासिक हप्ता न भरल्यास डाऊन पेमेंट बुडीत खात्यात जमा होते. 4. व्याजदर घटल्यास नुकसान होणार नाही याची निश्चिती बँकांना मिळते.

- लेखक bankbazaar.com चे सीईओ आहेत. adhil.shetty@dainikbhaskargroup.com