Home | Business | Gadget | local-std-calls-at-30-paisemin-on-aircel-mumbai

एअरसेलची आकर्षक सुविधा : 30 पैशात बोला 60 सेकंद

वृत्तसंस्था | Update - Jul 11, 2011, 06:36 PM IST

ग्राहकांना आता केवळ 30 पैसे प्रति मिनीट या दराने लोकल आणि एसटीडी कॉल करता येणार आहे.

  • local-std-calls-at-30-paisemin-on-aircel-mumbai

    मोबाईल सर्व्हिस देणा-या एअरसेल या कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त दरात सुविधा उपलब्ध करण्यासाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना आता केवळ 30 पैसे प्रति मिनीट या दराने लोकल आणि एसटीडी कॉल करता येणार आहे.
    या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना 34 रुपयांचे स्पेशल रिचार्ज व्हावचर घेणे आवश्यक आहे. या व्हावचरला 30 दिवसांची व्हॅलिडिटी असणार आहे. एसएमएसच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीने ही ऑफर तूर्तास मुंबईपुरतीच मर्यादित ठेवलेली आहे. याआधी मुंबई सर्कलमध्ये यूनिनॉर आणि व्हर्जिन जीएसएमकडून अशा ऑंफर लॉंच झालेल्या आहेत.

Trending