आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Low Price House Proposal, EPFO Give Financial Support

स्वस्त घरांसाठी प्रस्ताव, वाजवी दरातील घरांसाठी ईपीएफओने निधी द्यावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - स्वस्त घरांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) निधी उपलब्ध करून द्यावा, असा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) दिला आहे. ईपीएफओच्या विश्वस्त मंडळाची बैठक येत्या १९ डिसेंबर रोजी होणार असून तीत या प्रस्तावावर विचार करण्यात येणार आहे. ईपीएफओसाठी सर्व महत्त्वाचे निर्णय विश्वस्त मंडळ घेते. स्वस्त घरे सरकारच्या प्राधान्यक्रमात आहेत. याशिवाय गृहकर्जावर जोखीमही कमी असते. त्यामुळे या प्रस्तावाला महत्त्व आले आहे.

पीएमओच्या प्रस्तावानुसार, पीएफओने त्यांच्याकडील निधीपैकी १५ टक्के निधी स्वस्त घरांसाठी उपलब्ध करून द्यावा. हे शक्य न झाल्यास उर्वरित रक्कम ग्रामीण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंडात (आरआयडीएफ) आणि नाबार्डच्या रोख्यात गुंतवावी, असे त्यात म्हटले आहे.

पीएमओचा प्रस्ताव
-ईपीएफओने स्वस्त घरांसाठी आपल्या निधीतील १५ टक्के रक्कम द्यावी
-यामुळे ७० हजार कोटी रुपये मिळतील, त्यातून ३.५ लाख स्वस्त घरे बनवता येतील
-विमा-पेन्शन फंडाने आपल्या निधीतून १५ टक्के रक्कम दिल्यास २.३ लाख कोटी रुपये मिळतील.
-या रकमेतून ११.५ लाख स्वस्त घरे उभारता येतील
ईपीएफओचा नवा प्रस्ताव
- एए प्लस किंवा त्याहून उत्तम श्रेणी असलेल्या खासगी गृहवित्त पुरवठा कंपन्यांत गुंतवणुकीस परवानगी मिळावी
- या कंपन्यांत कोणत्याही सरकारी कंपनीचा किमान २५ टक्के हिस्सा असावा
- यात कोणत्याही इतर दुहेरी एएए श्रेणी असलेल्या कंपनीची २५ टक्के हिस्सेदारी असल्यास गुंतवणूक शक्य
सध्याची गुंतवणूक
ईपीएफओला सध्या सरकारी कर्जरोख्यांशिवाय दुहेरी एएए श्रेणी असलेल्या कंपन्यांच्या रोख्यात गुंतवणुकीस मुभा आहे. संघटनेची सध्या हुडको, एचडीएफसी, एलआयसी हाउसिंग फायनान्स, पीएनबी हाउसिंग फायनान्स, डीएचएफएल आणि इंडिया बुल्स हाउसिंग यासारख्या कंपन्यांच्या रोख्यात गुंतवणूक केलेली आहे. सरकारने २००५ मध्ये संघटनेला शेअर बाजारात ५ टक्के गुंतवणुकीस मुभा दिली होती. ही मर्यादा २००८ मध्ये वाढवून १५ टक्क्यांवर नेली होती. मात्र, जोखमीमुळे ईपीएफओ शेअर बाजारात गुंतवणूक करत नाही.
फायदा कोणाला?
समजा नियमात प्रस्तावानुसार बदल केल्यास अनेक कंपन्या ईपीएफओमध्ये गुंतवणुकीस लायक बनतील. यात जीआयसी हाउसिंग, कॅनरा होम फायनान्स, आयसीआयसीआय होम फायनान्स आणि गृह फायनान्स यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रस्तावानुसार नियमात बदल झाल्यास स्वस्त घरांचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे.