आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LPG Gas News In Marathi, Oil Company, Divya Marathi

महिन्यातून दोन सिलिंडर देण्यास एजन्सी देऊ शकणार नाही नकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - महिन्यातून केवळ एकच घरगुती वापराचे गॅस सिलिंडर मिळेल, असे काही गॅस एजन्सी ग्राहकांना सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, असे काही नियम नाही. ग्राहकाला महिन्यातून दोन सिलिंडर देण्यास कोणतीही गॅस एजन्सी नकार देऊ शकत नाही, असे तेल कंपनीचे समन्वयक आणि एचपीसीएलचे वरिष्ठ क्षेत्रीय व्यवस्थापक कृष्णा हांडा यांनी सांगितले. तेल मंत्रालयाचे तसे कोणतेही निर्देश नाहीत. तथापि, एक महिन्यात ग्राहकास एक सिलिंडर दिले जाईल. तथापि, ग्राहकाला आवश्यकता भासली तर एक महिन्यात दोन सिलिंडर मिळतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तेल मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, गॅस कनेक्शनधारक ग्राहकांना 1 एप्रिल 2014 पासून वर्षभरात 12 सिलिंडर निर्धारित सवलतीच्या दरात मिळणार आहेत. एखादा ग्राहक वर्षभरात 13 वे सिलिंडर घेऊ शकेल. मात्र, त्याला त्याचा दर विनासवलत (नॉन सब्सिडाइज्ड) असेल. हांडा यांनी स्पष्ट केले की, काही गॅस एजन्सी महिन्यात दोन सिलिंडर देण्यास नकार देत असतील, तर सेक्टर 19 स्थित तेल भवन, नवी दिल्ली येथे तक्रार दाखल करू शकता. इंडियन ऑइलचे क्षेत्रीय व्यवस्थापक राजीव शर्मा यांनी सांगितले की, महिन्यात दोन सिलिंडर देण्याबाबत काहीशी संभ्रमाची स्थिती होती. मात्र, आता तेल मंत्रालयाने आता स्पष्ट केले की, वर्षभरात देय असलेले 12 सिलिंडर ग्राहकास वाटले तर तो सहा महिन्यांतही खरेदी करू शकतो. परंतु, यानंतर 13 वे सिलिंडर त्याला विनासवलतीच्या दरात मिळेल.

असे आहेत नियम
ग्राहकाला 1 एप्रिल 14 पासून वर्षभर 12 एलपीजी सिलिंडर सवलतीच्या दरात मिळतील.
ऑनलाइन बुकिंग सेवेत गॅस सिलिंडर नोंदणीनंतर 48 तासांत मिळेल.
एखादा ग्राहक वर्षभरात 13 वे सिलिंडर घेऊ शकेल. मात्र, त्याला त्याचा दर विनासवलत असेल.
गॅस सिलिंडर ट्रान्स्परन्सी पोर्टलवर गॅस सिलिंडर वितरणाचा डाटा उपलब्ध आहे.

21 दिवसांनंतर बुकिंग असा काही नियम नाही
ऑल इंडिया एलपीजी डिस्ट्रिब्युटर फेडरेशन (एनडब्ल्यूआर)चे पेट्रेन ए. के. भाटिया यांनी सांगितले की, लोकांच्या मनात गैरसमज निर्माण झाला आहे की, एक सिलिंडर घेतल्यानंतर दुस-या सिलिंडरची बुकिंग 21 दिवसांनंतर केली जाईल. मात्र, असे काही नाही, ग्राहकाला सिलिंडरची आवश्यकता भासली आणि त्याचे वर्षभरात देय असलेले सवलतीच्या दरातील सिलिंडर बाकी असेल तर त्याला एका आठवड्याच्या आत दुसरे सिलिंडर तेही सवलतीच्या किमतीत मिळेल. ऑन लाइन बुकिंग केव्हा झाली आणि वितरकाने डिलिव्हरी केव्हा दिली, याचे रेकॉर्ड पाहून गॅस वितरकांना रेटिंग दिले जातील. डिलिव्हरीमध्ये काही गडबड झाली, तर कंपनी संबंधित गॅस वितरक एजन्सीचे रेटिंग कमी करते.